महाराष्ट्र

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या निकषांनुसार बालवाटिका-१ अर्थात नर्सरीसाठी तीन वर्षे, तर इयत्ता पहिलीसाठी सहा वर्षे पूर्ण असणे आवश्यक राहणार आहे. हे वय प्रवेशाच्या वर्षातील ३० जूनपर्यंत पूर्ण झालेले असावे. शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून या नियमांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार असून, शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे.

शासन निर्णयानुसार, शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून नर्सरी किंवा बालवाटिका-१ प्रवेशासाठी तीन वर्षे पूर्ण असणे आवश्यक असेल. २०२८-२९ पासून बालवाटिका-२ अर्थात ज्युनिअर के.जी.साठी चार वर्षे, २०२९-३० पासून बालवाटिका-३ अर्थात सिनिअर के.जी.साठी पाच वर्षे, तर २०३०-३१ पासून इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी सहा वर्षे पूर्ण असण्याचा निकष लागू होईल.

यापूर्वी राज्य मंडळासह सीबीएसई, आयसीएसई आणि आयबी अभ्यासक्रमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादेचे निकष वेगवेगळ्या तारखांनुसार निश्चित केले जात होते. तसेच पूर्वप्राथमिक वर्गांमध्ये प्रवेशासाठी निश्चित वयोमर्यादेची अट नव्हती. केंद्र शासनाने इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी बालकाचे वय सहा वर्षांपेक्षा अधिक असावे, असे निर्देश दिले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील तरतुदींच्या अनुषंगाने राज्य शासनाने आता सर्व स्तरांसाठी वयोमर्यादेचे निकष निश्चित केले आहेत.

दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये नर्सरी ते इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यमान विद्यार्थ्यांना हे नवीन निकष लागू होणार नाहीत. तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून मागील वर्ग उत्तीर्ण झालेल्या नियमित विद्यार्थ्यांना पुढील उच्च वर्गात प्रवेश देताना वयोमर्यादेच्या निकषांतून सूट देण्यात आली आहे.

पूर्वप्राथमिक वर्गांपासून इयत्ता पहिलीपर्यंत प्रवेश देताना शाळाप्रमुखांना निर्धारित किमान आणि कमाल वयोमर्यादेत १५ दिवसांची सूट देता येणार आहे. पायाभूत वर्गांतील नामांकन तसेच नर्सरी ते इयत्ता पहिलीच्या प्रवेश प्रक्रियेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल.

नवीन वयोमर्यादेनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी आवश्यक सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांच्याकडून जारी करण्यात येणार आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर…

1 तास ago

सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी सुनेत्रा पवार मैदानात; महायुती एकदिलाने काम करत असल्याचा दावा

नांदेडमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जाहीर सभा; अजितदादांच्या विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन नांदेड: अजितदादा…

2 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा मदतीचा हात; दिवाळीचा शिधा घेऊन ट्रक रवाना करणार; एकनाथ शिंदे

शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन, मुलींच्या विवाहासाठीही मदत; डोंबिवलीतील नवरात्रोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा संदेश डोंबिवली :…

2 तास ago

ग्रंथालये टिकवणे ही काळाची गरज; ग्रंथसंपदा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक; सचिन अहिर

मुंबई: ग्रंथ माणसाला घडवण्याचे काम करतात. ही अमूल्य ग्रंथसंपदा उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांचे जतन आणि…

2 तास ago

राष्ट्रीय इन्स्पायर–मानक स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी; श्रद्धा लोंढे देशात प्रथम

मुंबई: बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातून…

2 तास ago

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

5 तास ago