महाराष्ट्र

मनसे आणि शिवसेना आपल्या दोघांचीच

मुंबई: आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील नेते पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने एमआयजी क्लब येथे मनसे नेते, शहराध्यक्ष, सरचिटणीस, विभाग अध्यक्ष हे सगळे बैठकीला उपस्थित होते.

यावेळी राज ठाकरे यांनी मुंबईतील नेते पदाधिकाऱ्यांना आज मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केलं. मुंबईमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे या दोनच पक्षाच्या कार्यकर्त्यांची तळागाळात ताकद आहे. या दोन पक्षाव्यतिरिक्त बाकी पक्षांची मुंबईत एवढी ताकद नाही, त्यामुळे कामाला लागा अशा सूचना देखील राज ठाकरे यांनी बैठकीत दिल्याची माहिती समोर आली आहे.

मनसे गटाध्यक्षांनी व इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष जबाबदारी घेऊन निवडणुकीच्या कामाला लागा, मतदार याद्या तपासा या सूचना मनसे अध्यक्ष मुंबईतील नेते पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुंबई महापलिका निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने काही सूचना राज ठाकरे यांनी आजच्या या बैठकीत नेते आणि पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत. मतदार यादीतील घोळ हे 2017 पासून सांगत आहोत, आता बाकीच्यांनी हा विषय घेतलाय, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

कबुतरखान्यावरुन राज ठाकरेंची रोखठोक भूमिका

कबुतरखान्याबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सगळ्यांना वागावं लागेल. जैन मुनींना देखील हे समजले पाहिजे. कबुतरांमुळे काय काय रोग होतात ते ही समजलं पाहिजे. कबुतरांना खायला घालू नये, असा न्यायालयाचा आदेश आहे. त्यामुळे जे कोणी कबुतरांना खायला घालतील त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी, असं राज ठाकरेंनी सांगितले. काही गोष्टींचा विचार करणे खूप गरजेचं आहे. जेव्हा जैन लोकांकडून दादरच्या कबुतरखान्याजवळ आंदोलन झालं तेव्हा त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे होती, असंही राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंनी मंत्री मंगलप्रभात लोढांनाही झापलं

कबुतरखान्याबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही काही उपाय मुंबई महानगरपालिकेला सुचवले होते. यादरम्यान, राज ठाकरेंनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर देखील निशाणा साधला. लोढा-बिढा सारखे माणसं सारखे मध्ये येताय, मंगलप्रभात लोढा काही समाजाचे मंत्री नाही. ते एक राज्याचे मंत्री आहेत, असं राज ठाकरे म्हणाले. मंगलप्रभात लोढा यांनी देखील न्यायालयाचा निर्णय मानला पाहिजे, असंही राज ठाकरेंनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

4 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

8 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

8 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

9 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

9 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

10 तास ago