महाराष्ट्र

HSRP नंबर प्लेट नसेल तर पोलीस काय करणार? जप्ती की परवाना रद्द? नवे नियम जाणून घ्या…

औरंगाबाद: जुन्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम तारीख 3१ डिसेंबर २०२५ होती. ही मुदत संपल्यानंतर अनेक वाहनधारकांमध्ये दंड, गाडी जप्ती किंवा परवाना रद्द होण्याची भीती निर्माण झाली होती. कारण यानंतर कोणतीही अधिकृत मुदतवाढ जाहीर करण्यात आलेली नव्हती.

वाहनधारकांसाठी दिलासादायक निर्णय

परिवहन विभागाने सध्या HSRP नसलेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या गाडी जप्त होणार नाही

परवाना रद्द होणार नाही

तात्काळ दंड आकारला जाणार नाही

जोपर्यंत नवीन कंत्राटदार काम सुरू करत नाही, तोपर्यंत कारवाई होणार नाही, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

HSRP एजन्सींची अडचण काय आहे

राज्यात याआधी खालील तीन एजन्सी नेमण्यात आल्या होत्या –

रोमजार्टा सेफ्टी सिस्टिम

रियल मेजॉन इंडिया

एफटीए एचएसआरपी सोल्यूशन्स

या सर्व कंत्राटदारांची मुदत आता संपली आहे. त्यामुळे परिवहन विभागाने नवीन निविदा प्रक्रिया सुरू केली असून नव्या एजन्सीचा शोध सुरू आहे.

याआधीचे दंड नियम काय होते

ऑनलाइन नोंदणी केली पण नंबर प्लेट बसवली नाही तर १००० रुपये दंड

कोणतीही प्रक्रिया सुरूच केली नाही तर १०,००० रुपये दंड

मात्र सध्या प्रत्यक्ष कारवाईबाबत संभ्रम असल्यामुळे ही दंडात्मक कारवाई तात्पुरती थांबवण्यात आली आहे.

ही सवलत किती काळासाठी

ही सवलत किती दिवस राहील, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. म्हणून वाहनधारकांनी याचा गैरफायदा न घेता पुढील सूचना येईपर्यंत सतर्क राहणे गरजेचे आहे.

सध्या तरी HSRP नसल्यामुळे पोलीस गाडी जप्त करणार नाहीत किंवा परवाना रद्द होणार नाही. मात्र भविष्यात नियम कडक होण्याची शक्यता असल्याने वेळेत HSRP बसवणेच सुरक्षित ठरेल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

11 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

15 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

15 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

15 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

15 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

16 तास ago