महाराष्ट्र

थेट मुख्यमंत्र्यांना लग्नाचं आमंत्रण देणाऱ्या IPS चंदना दीप्ती आहेत तरी कोण

मुंबई: प्रशासकीय सेवेत रुजू होऊन समाजात काही बदल घडवून आणण्याचे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी खूप आधीपासूनच प्रयत्न करत असतात. असंच काहीसं चंदना दीप्ती यांनी केलं. चंदना डीप्ती या एक डॅशिंग आयपीएस अधिकारी आहेत. त्या निडर अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. दीप्ती चंदना यांनी २०१२ मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी यूपीएससी परीक्षेत ५५१ रँक प्राप्त केली.

चंदना दीप्ती या मूळच्या तेलंगणातील वारंगळ जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचे बालपणदेखील तिथेच गेले. चंदना दीप्ती यांनी आंध्र प्रदेशमधील गुड शेफर्ड शाळेतून शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आयआयटी दिल्लीमध्ये अॅडमिशन घेतले. त्यांनी कॉम्प्युटर सायन्स विषयात बी.टेक पदवी प्राप्त केली.

दीप्ती या लहानपणापासूनच खूप हुशार होत्या. इंजिनियरिंग केल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी परीक्षादेखील पास केली. आज त्या आयपीएस अधिकारी म्हणून रुजू आहेत. चंदना दीप्ती या उत्कृष्ट डान्स आणि उत्तम तेलुगु लेखिकादेखील आहे. त्या नेहमी कामातून वेळ काढत आपला छंद जोपासत असतात.

चंदना यांची तेलंगणामध्ये खूप लोकप्रियता आहे. त्यांचे सोशल मीडियावरदेखील लाखो फॉलोवर्स आहेत. त्या नेहमी सोशल मीडियाद्वारे फोटो पोस्ट करत असतात. त्या कामाच्या व्यापातून वेळ काढत वाचण करतात. टेनिससारखे गेम खेळतात.

मुख्यमंत्र्यांना दिलं होतं लग्नाचं आमंत्रण

चंदना दीप्ती यांनी थेट आपल्या लग्नाचं आमंत्रण मुख्यमंत्र्यांना दिलं होतं. तेलंगणाचे तत्कालीन मुख्यमंत्री के.सी. राव यांना लग्नासाठी आमंत्रण दिलं होतं. त्या आंध्र प्रदेशची सून होणार असल्याचेही त्यांनी सांगितलं होतं. यानंतर त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कोंढापुरीत तरुणावर चाकूने वार करत खून; शिक्रापुर पोलिसांनी १२ तासांत आरोपीच्या आवळल्या मुसक्या

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील कोंढापुरी येथे आज बुधवार (दि २१) रोजी सकाळी सातच्या सुमारास…

12 तास ago

घोड धरणातील वाळूमाफियां विरोधात वडगाव-शिंदोडी ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव; तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

श्रीगोंदा (विशेष प्रतिनिधी) घोड धरणाच्या बॅकवॉटरमध्ये गेल्या पाच वर्षांपासून रात्रंदिवस बेकायदशीर वाळू उपसा सुरु असून,…

17 तास ago

शिरुर पोलिस ऍक्शन मोडवर ‘राजहंस लॉज’ वर छापा टाकत अनधिकृत ‘वेश्या’ व्यवसाय प्रकरणी एका पत्रकारासह दोघांना अटक

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथील राजहंस लॉजमध्ये महिलेकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची…

19 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित शिवसेनेचा दसरा मेळावा; मदतीसाठी राज्यव्यापी कार्यक्रमाची घोषणा होणार

मुंबई: राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने यंदाचा दसरा मेळावा संकटग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित केला आहे. गोरेगाव येथील…

2 दिवस ago

दुष्काळग्रस्त गावांसाठी स्वतंत्र सूक्ष्म कृती आराखडे तयार करा

धाराशिव जिल्ह्यातील पाणी, चारा टंचाईवर उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचे डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश धाराशिव: जिल्ह्यातील…

2 दिवस ago

टायगर श्रॉफच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे वांद्र्यात; कलाकारांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे निर्देश

मुंबई: बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर आज संध्याकाळी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली. या…

2 दिवस ago