पुणे: कोंढवे धावडे येथील हाॅटेलमध्ये किरकोळ वादातून कामगाराने हाॅटेल मालकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. पीकॉक फॅमिली गार्डन बार अँड लॉजिंग येथे मंगळवारी (दि. 26) रोजी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.
संतोष सुंदर शेट्टी (वय ४५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी कामगार उमेश दिलीप गिरी (वय ३९, रा. कात्रज) याला ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. कामगाराने आपल्या मालकाचा चाकूने भोसकून खून केल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.
याबाबत बोलताना पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, आरोपी कामगार गिरी हा मागील एक महिन्यापासून शेट्टी यांच्याकडे काम करत होता. शेट्टी यांनी पीकॉक गार्डन अँड रेस्टॉरंट हे हॉटेल भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी घेतले आहे. गिरी हा दारू पिऊन कामावर येत होता. तसेच तो काम देखील व्यवस्थित करत नसे. त्यावरून शेट्टी त्याला रागावत असत.
मंगळवार (दि. 26) रोजी रात्री देखील कामगार गिरी आणि शेट्टी या दोघात किरकोळ वाद झाला, त्यावेळी गिरी याने किचनमधील चाकूने शेट्टी यांच्या मानेवर वार केला. वार वर्मी लागल्यामुळे शेट्टी यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, प्रसंगावधान राखत तेथील काही कामगारांनी गिरी याला पकडून ठेवले. त्यानंतर उत्तमनगर पोलिसांना ही माहिती देण्यात आली. त्यानुसार उत्तमनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी कामगाराला ताब्यात घेतले.
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…