महाराष्ट्र

‘द अजित पवार’ मध्ये कोण साकारणार मुख्य भूमिका? स्वतः अजित दादांनी सांगितलेलं नाव; म्हणाले…

मुंबई: महाराष्ट्राला चार दिवसांपूर्वी हादरवणारी घटना घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आणि संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. त्यांच्या अचानक जाण्याने समर्थकांसह राजकीय विरोधकही भावुक झाले आहेत.

अशातच अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवार आपल्या संभाव्य बायोपिकबाबत बोलताना दिसत असून, त्यांची भूमिका कोण साकारावी याबाबतही ते स्पष्टपणे मत व्यक्त करताना दिसतात.

हा व्हिडिओ झी गौरव चित्र पुरस्कार २०२४ मधील असून, त्या सोहळ्याला अजित पवार उपस्थित होते. अभिषेक बारहाते यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये संगीतकार आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते अजित पवार यांना प्रश्न विचारतात, “जर ‘द अजित पवार’ नावाचा बायोपिक आला तर त्यात तुमची भूमिका कोणत्या अभिनेत्याने साकारावी?”

यावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात,“निलेश साबळे. डॉक्टरने करावं असं वाटतं.”हे उत्तर ऐकून शेजारी उभा असलेला निलेश साबळेही क्षणभर चकीत होतो. त्यावर प्रतिक्रिया देताना निलेश म्हणतो,“मी किती चांगलं करेन माहित नाही, पण लोकांना ते आवडायचं. दादा स्वतः हे सगळं पाहतात, हे मला माहित नव्हतं. आता मात्र जरा जपून करायला लागेल.”

यावर अजित पवार पुढे म्हणतात,“मी कधी कधी ते काय बोलतात ते बघत असतो. आम्ही आरशासमोर प्रॅक्टिस करून बोलत नाही. माईक हातात आल्यानंतर जे विचार पटतात त्याप्रमाणे बोलतो. पण ह्यांनी (निलेश साबळे) माझी नक्कल करताना ‘या ठिकाणी, या ठिकाणी’ हा शब्द वापरला. तेव्हापासून मी तो शब्द कमीत कमी वापरण्याचा प्रयत्न केला.”

ते पुढे हसत म्हणतात,“त्यानंतरच्या काळात तुम्ही पाहिलं असेल की अजित पवारने हा शब्द कमी केला आहे. त्यामुळे डॉक्टर, अधूनमधून माझी नक्कल करत जा. त्यातून मलाही कळेल की काय योग्य आहे आणि काय अयोग्य, आणि त्याप्रमाणे दुरुस्ती करता येईल.”

आज अजित पवार यांचं हे बोलणं पुन्हा एकदा समोर आल्यानं अनेकांच्या डोळ्यांत पाणी आलं आहे. ‘द अजित पवार’ असा बायोपिक जर प्रत्यक्षात आला, तर त्याला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळेल, याबाबत शंका नाही.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

12 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

13 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

13 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

13 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

13 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

13 तास ago