महाराष्ट्र

देश कायद्याने चालणार की महाशक्तीच्या मर्जीने?

महाराष्ट्रातील जनता गद्दारांना माफ करणार नाही…

मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने आज शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. एकनाथ शिंदे आणि त्यांचे साथीदार ज्या महाशक्तीच्या जीवावर पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळेल असे सांगत होते ते अखेर प्रत्यक्षात आले आहे. त्यामुळे या देशातील स्वायत्त संस्था कायद्याने चालणार की महाशक्तीच्या मर्जीने असा प्रश्न निर्माण झाला आहे. ठाकरेंच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह तुम्ही चोरू शकता पण त्यांना असणारा जनतेचा आशिर्वाद कसा काढून घेणार असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे.

यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेतील फुटी संदर्भातील प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. ती अद्याप पूर्ण व्हायची असून त्याचा निकाल येण्याआधीच निवडणूक आयोगाने नाव आणि चिन्हाबाबतचा निर्णय कोणाच्या दबावाखाली घेतला आहे? निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे पण त्यांच्या कार्यपद्धतीत ते कुठेही दिसत नाही. या संपूर्ण प्रकरणात आयोगाची कार्यपद्धती एकतर्फी आणि संशयास्पद राहिली आहे. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या बोटाला धरुन महाराष्ट्रात वाढलेल्या भाजपने आज त्यांचा पक्ष संपवण्याचा कृतघ्नपणा केला आहे.

महाराष्ट्रातील जनता हे सर्व उघड्या डोळ्याने पहात आहे. भाजप केंद्रीय संस्थाचा वापर करून ठाकरेंचा पक्ष हिसकावून घेऊ शकते पण जनतेचा ठाकरेंना असणारा आशिर्वाद कसा हिसकावून घेणार ? महाराष्ट्रातील जनता गद्दारांना माफ करणार नाही शेवटी उद्धव ठाकरे यांचाच विजय होईल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

6 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

10 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

10 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

10 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

10 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

11 तास ago