मुंबई: काँग्रेस पक्षाचे नेते, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष विकास सावंत यांच्या निधनामुळे एक समर्पित व अभ्यासू नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या आहेत.
विकास सावंत यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, विकास सावंत हे काँग्रेस विचारांचे सच्चे पाईक होते. वडील माजी मंत्री भाई सावंत यांचा समाजसेवेचा वारसा त्यांनी समर्थपणे चालवला. विनम्र स्वभाव, राजकीय शुचिता आणि सामाजिक प्रश्नांची जाण आणि ते सोडवण्याची तळमळ या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे त्यांचा लोकसंग्रह मोठा होता. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीपासून ते स्थानिक प्रश्नांवर लढा देण्यात ते सदैव अग्रेसर राहिले. समाजकारणीसोबतच कृषी, सहकार आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले.
विकास सावंत यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सावंत कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…