महाराष्ट्र

महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सूट…

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या महिलांसाठी मोठ्या घोषणा…

औरंगाबाद: राज्याच्या अर्थसंकल्पात आज महिलांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची घोषणा करण्यात आली असून राज्य परिवहन मंडळाच्या प्रवासात महिलांना तब्बल ५० टक्के सूट देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यांतर्गत प्रवास करताना महिलांना फक्त निम्मे तिकिट द्यावे लागणार आहे. राज्यात लवकरच सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार तसेच महिलांच्या सुरक्षित आणि सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यंटन धोरण तयार कऱणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केला. शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांकरिता केंद्र सरकारच्या मदतीने ५० वसतीगृह स्थापन करणार असल्याची घोषणाही अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

अर्थसंकल्पात महिलांसाठी करण्यात आलेल्या घोषणा पुढील प्रमाणे

महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर उभारणार

कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर उभारणार

मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना करणार

महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण राबवणार

माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार करणार

आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये करणार

गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये करणार

अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये करणार

मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये करणार

अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये करणार

अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार

अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली विकसित करणार

शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतीगृहांची निर्मिती करणार

अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना राबवणार. या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा देणार. या योजनेत 50 नवीन ‘शक्तीसदन’ निर्माण करणार.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात महसूलचे अधिकारी कर्मचारी आरक्षण सोडतीत व्यस्त; अन मुरुम माफिया नैसर्गिक संपत्तीच्या लुटीत मस्त…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात आज (शुक्रवार) ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वार्डनिहाय आरक्षण सोडतीची प्रक्रिया…

13 तास ago

रांजणगाव MIDC मधील औषध कंपनीला २५ लाखांच्या खंडणीची मागणी; वकिलाविरोधात गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी परिसरातील एका नामांकित औषध निर्मिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंपनी…

13 तास ago

कुर्ला विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: कुर्ला मतदारसंघातील लोकाभिमुख विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. नेहरूनगर येथील पोलीस…

18 तास ago

राष्ट्रवादीतील संघर्षाचा फुगा आणि घराणेशाहीची वास्तवकथा

मुंबई: राजकारणात काही गोष्टी इतक्या उघडपणे घडतात की त्यावर भाष्य करण्यासाठी दुर्बिणीची गरज नसते; फक्त…

18 तास ago

विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा! डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची ‘स्टुडंट फॅसिलिटेशन सिस्टीम’ सुरू

मुंबई: राज्यातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी…

18 तास ago

पुणे विषारी दारू प्रकरणाच्या तपासाला वेग; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचनांनुसार सीआयडीची व्यापक कारवाई

पुणे: पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणाची शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती…

18 तास ago