शिरूर तालुका

दुकानदारांनो सावधान! दुकानदाराला बोलण्यात गुंतवुन चोरट्यांनी ३४ हजार रुपये केले लंपास

शिरूर तालुक्यात टोळी सक्रिय

शिरुर (अरुणकुमार मोटे): वस्तू खरेदीच्या बहाण्याने अज्ञात व्यक्ती दुकानात गर्दी नसताना दुकानात येऊन बोलण्यात गुंतवून हातचलाखीने दुकानाच्या गल्ल्यातील, ग्राहकांच्या खिशातील पैसे घेऊन जाणारी टोळी पुणे जिल्हयासह तालुक्यात, तालुक्यातील ग्रामीण भागात सक्रिय झाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मलठण (ता. शिरूर) येथील अतुल यशवंत थोरात यांच्या गुरूदत्त किराणा दुकानामध्ये कोल्ड्रींक्स घेण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी इंग्लिश मध्ये संभाषण करून किराणा दुकानदाराला छान छान बोलून तुमची इंडीयन करन्सीला कोणत्या नोटेला किती किंमत आहे. अश्या पद्धतीने मध्येच देवाच्या असणाऱ्या पॅकेट मध्ये काय आहे what is this असे विचारले असता ते बघन्याचे निम्मित करून बोलत असताना दुसऱ्या व्यक्तीने दुकानातील मोजून खाली ठेवलेले पैसे घेऊन त्यातील रक्कम ४३ हजार घेऊन त्यातील ९ हजार ठेवले व ३४ हजार घेऊन पसार झाले. ते दुकानात feej नावाचे कोल्ड्रिंक्स खरेदी करण्याचे बहाण्याने आले होते.

तसेच शिरूर शहरातील सुखकर्ता मेडीकलमध्ये 8 दिवसांपुर्वी गर्दीचा फायदा उचलून ग्राहकाच्या खिशातुन अंदाजे १० हजार रुपये लपांस केले आहे. एकुणच शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत विविध चोऱ्यांची दिवसेंदिवस वाढ होत असून चोरांना शिरूर पोलिसांना आवरणे मुश्किल झाले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

18 तास ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

1 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

1 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

4 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

6 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

6 दिवस ago