महाराष्ट्र

युवा स्वाभिमानची ऐतिहासिक मुसंडी; भाजपला सत्तेसाठी तडजोडीची वेळ

अमरावती: अमरावती महापालिका निवडणुकीत युवा स्वाभिमान पक्षाने १५ जागा जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली असून, भाजपला सत्तास्थापनेसाठी त्यांच्या पिचवर येण्यास भाग पाडले आहे. या निवडणुकीत भाजपला तब्बल २० जागांचे नुकसान सहन करावे लागले असून, पक्षाला केवळ २५ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

काँग्रेसने १५ जागा जिंकत आपली इभ्रत वाचवली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यावेळी ११ जागा जिंकून नव्याने उदयास आला आहे. एमआयएमने सलग दुसऱ्यांदा दमदार कामगिरी करत १२ जागा पटकावल्या.

मतमोजणीला विलंब, पण निकाल स्पष्ट

८७ जागांच्या अमरावती महापालिकेसाठी झालेल्या निवडणुकीत सरासरी ५३ टक्के मतदान झाले होते. आज (ता. १६) सकाळी १० वाजेपासून नवसारी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे मतमोजणीला सुरुवात झाली. मात्र नियोजनाच्या अभावामुळे निकाल जाहीर होण्यास विलंब झाला. या निवडणुकीत अनेक बडे दिग्गज पराभूत झाले.

भाजपला मोठा धक्का

भाजपने यावेळी ६८ जागांवर उमेदवार दिले होते, तर ६ जागांवर अपक्षांना पाठिंबा दिला होता. मुख्यमंत्री, पालकमंत्री, राज्यमंत्री आणि दीड डझन आमदारांची फौज उतरवूनही भाजपला गतवेळचे वैभव मिळवता आले नाही.

मागील निवडणुकीत ४५ जागा जिंकणारा भाजप यावेळी २५ जागांवर घसरला.

सत्ता स्थापन करताना अडचणी

महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी ४५ जागांची आवश्यकता आहे. भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला असला, तरी त्यांना युवा स्वाभिमानची साथ अनिवार्य ठरणार आहे.

भाजप (२५) + युवा स्वाभिमान (१५) = ४० जागा होत असल्याने उर्वरित ५ जागांसाठी बसपा व शिंदे गटाची मनधरणी करावी लागणार आहे.

दरम्यान, युवा स्वाभिमान राष्ट्रवादीसोबत युती नाकारण्याची शक्यता असल्याने भाजपला त्यांच्या अटी मान्य कराव्या लागण्याची चिन्हे आहेत.

रवी राणांचा दबदबा वाढला

युवा स्वाभिमानने ३६ जागांवर उमेदवार देत १५ जागा जिंकून राजकीय धक्का दिला आहे. आमदार रवी राणा यांचा सभागृहातील दबदबा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मागील वेळी केवळ ३ जागा असताना यावेळी तब्बल १२ जागांची वाढ झाली.

एमआयएमनेही २ जागांची वाढ करत १० वरून १२ जागांपर्यंत मजल मारली असून, अल्पसंख्याक भागात काँग्रेस व राष्ट्रवादीला रोखण्यात पक्षाला यश मिळाले आहे.

पक्षीय बलाबल (एकूण जागा : ८७)

भाजप : २५

काँग्रेस : १५

युवा स्वाभिमान : १५

राष्ट्रवादी (अजित पवार) : ११

एमआयएम : १२

शिवसेना (शिंदे) : ३

शिवसेना (उबाठा) : २

बसपा : ३

वंचित बहुजन आघाडी : १

अमरावती महापालिका : विजयी उमेदवार

साईनगर

सचिन भेंडे (युवा स्वाभिमान)

मंजूषा जाधव (भाजप)

बुधवारा – जवाहरगेट

विलास इंगोले (काँग्रेस)

संजय शिरभाते (काँग्रेस)

सुनीता भेले (काँग्रेस)

ललिता रतावा (काँग्रेस)

रहाटगाव – शेगाव

गुड्डू धर्माळे (राष्ट्रवादी)

चंदू खेडकर (राष्ट्रवादी)

कल्याणी तायडे (भाजप)

वंदना मडघे (भाजप)

जोग स्टेडियम – चपराशीपुरा

बबलू शेखावत (काँग्रेस)

आसमा फिरोज खान (काँग्रेस)

अर्चना आत्राम (काँग्रेस)

मालती गवई (काँग्रेस)

स्वामी विवेकानंद कॉलनी – फ्रेजरपुरा

स्मिता सूर्यवंशी (भाजप)

राधा कुरील (भाजप)

प्रिती रेवणे (युवा स्वाभिमान)

प्रदीप हिवसे (भाजप)

बेनोडा – भीमटेकडी – दस्तूर नगर

राजेश जवंजाळ

मंगेश मनोहर

अविनाश मार्डीकर

अंजना पाटील

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

11 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

11 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

11 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

11 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

12 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

12 तास ago