महाराष्ट्र

Video: जि.प. शाळा चर्चेत! इयत्ता १तील विद्यार्थी म्हणतात 26 पर्यंत पाढे…

पुणेः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोमखेल (आव्हाळवाडी, वाघोली, पुणे) शाळेतील इयत्ता १ली तील विद्यार्थी 26 पर्यंतचे पाढे म्हणतात. शिरूर तालुक्यातील पारोडी या गावचे सुपूत्र व वर्गशिक्षक बाळासाहेब टेमगिरे यांच्या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातून कौतुक केले जात आहे.

जि. प. प्राथमिक शाळा डोमखेल (आव्हाळवाडी) शाळा सध्या हवेली तालुक्यात चर्चेत आली आहे. कारण सध्या त्या शाळेत इयत्ता पहिली पासून ६वी पर्यंत सर्वच वर्गांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण सर्वच शिक्षक करत आहेत. यावर्षी म्हणजेच 2024-25 या शैक्षणिक वर्षात मंथन परिक्षेत इयत्ता 1लीची विद्यार्थीनी कु. अनुष्का तुडमे ही 250 पैकी 234 गुण मिळवून राज्यात ६ व्या क्रमांकावर आली. कु. संस्कृती शरद सातव, आरवी नारायण सातव या विद्यार्थींनी 132 गुण मिळवून राज्यात सातव्या क्रमांक मिळवला आहे. सध्या शाळेत १ ते ६ वीपर्यंत वर्ग असून, शाळेचा पट 302 आहे. सर्वच शिक्षक उत्कृष्ट अध्यापन करत आहेत.

जि. प. प्राथमिक शाळा डोमखेल या शाळेत गोरगरीबांची मुले शिकत असून या शाळेसाठी अत्याधुनिक इमारत (सर्व सुखसुविधा उपलब्ध असणारी) आहे. शाळेचे आधारस्तंभ असणारे आव्हाळवाडी गावचे विद्यमान ग्रां प सदस्य तथा चेअरमन ज्ञानेश्वरी उदयोग समुह प्रा लि चे चेअरमन काकासाहेब रामराव सातव पाटील (वैयक्तिक ५० लाख रुपये), तसेच आव्हाळवाडी गावचे माची सरपंच रामदास (आबा ) सातव पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुमंत अशोकराव सातव पाटील, सर्वच ग्रामस्थ डोमखेल यांच्या प्रयत्नातून उभी राहिली आहे.

सध्या शाळेत इयत्ता पहिलीचे विद्यार्थी १ ते २६ पर्यंत चे पाढे इंग्रजी आणि मराठीतून न अडखळता बोलत आहेत. इयत्ता पहिली चे वर्गशिक्षक बाळसाहेब टेमगिरे सर यांचा स्तुत्य उपक्रम पाहून अनेक पालक या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत. शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी, कोयाळी पूनर्वसन तसेच हवेली तालुक्यातील लोणीकंद या शाळांनंतर गुणवत्तेबाबत डोमखेल शाळा ही शाळा सध्या चर्चेत आहेत.

शिरूर तालुक्यातील ३७ शाळांचा शंभर टक्के दहावी निकाल; एकूण निकाल ९७.२९%

राज्यातील 78.40 टक्के शाळांमध्ये संगणक सुविधा उपलब्ध

राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम सुरु करणार, मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का?

सावधान; पालकांनो शिरुर मधील इंग्लिश माध्यमातील शाळांमध्ये आपल्या मुलांना प्रवेश घेताय…तर हि बातमी नक्की वाचा

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

7 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

7 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

7 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

22 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago