राजकीय

जास्त बोलू नका नाहीतर…

मुंबई: नुकतीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केले आहे. हिंदीसक्तीच्या अध्यादेश मागे घेतल्यावर ५ रोजी झालेल्या मेळाव्यातील भाषणात उद्धव ठाकरेंनी शिंदेवर टीका केली होती. एकनाथ शिंदेंनीही त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं. उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना लक्ष्य करत थेट इशारा दिला आहे.

शिंदेंना चोख प्रत्युत्तर

मी पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता तर काय झालं असतं याचा विचार केला पाहिजे, असा टोला शिंदेंनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला होता. आता यावरून उद्धव ठाकरे यांनी या विधानाचा समाचार घेतत्यांची अर्धी दाढी राहिलीय हे नशीब. त्यांनी जास्त बोलू नये, नाहीतर लोक त्यांची बिनपाण्याने करतील, राहिलेली अर्धी दाढीही काढतील, असं म्हणत चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

आपल्याकडून झालेली ही सर्वात मोठी चूक

तसेच महाविकास आघाडीतील मतभेदांवर निवडणुकीतील पराभवाचे खापर फोडले आहे. याविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, लोकसभेत माझ्याकडे उमेदवार होते, जागा होती, पण निशाणी नव्हती. विधानसभेत निशाणी होती, पण जागा नव्हत्या. जागा कोणत्या हा प्रश्न होता. जागा मिळाल्या तर उमेदवारी कुणाला देणार हे निश्चित नव्हते. तू तू मै मै झाली ती स्वीकारली पाहिजे. आपल्याकडून झालेली ही सर्वात मोठी चूक होती. ही चूक परत करायची असेल तर एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही.

…त्यामुळे असे हे दिवटे गेलेले बरे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे पक्षाला मोठी गळती लागली आहे. यावरही उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही वेळेला साचलेल्या डबक्याला थोडासा आऊटलेट द्यावा लागतो आणि नवीन झरा यावा लागतो, असं ते म्हणाले आहेत. तसेच त्यांनी पक्षातून गेलेल्यांना जोरदार टोलाही लगावला आहे. आता जे आमच्यातून गेले ते तिकडे जाऊन काय दिवे लावताहेत ते तुम्ही बघताच आहात. त्यामुळे असे हे दिवटे गेलेले बरे. अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी पक्षातून गेलेल्यांना सुनावलं आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेत बिनविरोध निवड; शिंदेंचा विश्वास सार्थ ठरवण्याचा निर्धार

मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.…

22 तास ago

पाणी पिताना केलेल्या ३ चुका पडतात महागात

पाणी केवळ तहान भागवत नाही तर, शरीराला अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स प्रधान करते. त्वचा, डोळे,…

23 तास ago

हाय ब्लड प्रेशरला हलक्यात घ्याल तर होईल पश्चाताप

बरेच लोक इतर आजारांच्या तुलनेत हाय ब्लड प्रेशरला फार गंभीरतेने घेत नाहीत. ही एक सामान्य…

23 तास ago

शिरूर शहरात वारंवार वीज खंडित; रोहित्रांची क्षमता वाढविण्याची नागरिकांची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील मारुती आळी, सरदार पेठ तसेच रामलिंग रोड परिसरात गेल्या काही…

23 तास ago

बारामतीकरांचा अभूतपूर्व कौल; सुनिल तटकरे यांचा मानाचा मुजरा, पश्चिम बंगाल परिवर्तनावरही भाष्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…

2 दिवस ago

बंगालमध्ये तृणमूल पिछाडीवर! वाघासारखं लढत राहू;  ममता बॅनरजी यांची प्रतिक्रिया

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…

2 दिवस ago