महाराष्ट्र

काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता; ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर

परभणी: राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेते आपल्या सोईच्या पक्षात प्रवेश करत असतानाच, आता परभणी जिल्ह्यातून काँग्रेसला हादरा देणारी एक मोठी माहिती समोर येत आहे. परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि जिल्हाप्रमुख, माजी आमदार सुरेश वरपूडकर हे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे परभणी जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार सुरेश वरपूडकर यांनी मुंबईत भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात अनेक तर्क लावले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून वरपूडकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा परभणी जिल्ह्यात सुरू होत्या. अशा परिस्थितीत त्यांनी बावनकुळे यांची भेट घेतल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला बळ मिळाले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे आणि सुरेश वरपूडकर यांच्या भेटीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. या भेटीवेळी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि भाजपचे जिल्हाप्रमुख सुरेश भुमरे हे देखील उपस्थित होते. येत्या २४ जुलै रोजी सुरेश वरपूडकर यांचा मुंबई येथे भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे, ज्यामुळे परभणीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

दरम्यान, वरपूडकर यांच्या भाजप प्रवेशाची तारीखही समोर आल्यानंतर आता परभणीच्या काँग्रेसमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. वरपूडकर हे काँग्रेसचे जिल्हाप्रमुख असल्यामुळे परभणीत त्यांची चांगली ताकद आहे. याच कारणामुळे ते जर भाजपमध्ये जाणार असतील, तर त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते आणि इतर पदाधिकारीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वरपूडकर यांचा भाजप प्रवेश म्हणजे काँग्रेसला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. तसेच, वरपूडकर भाजपमध्ये गेल्यास त्याचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

22 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago