राजकीय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात आचारसंहिता भंग प्रकरणी गुन्हा दाखल करा…

मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदिवली मतदारसंघात अनधिकृतपणे भेट देऊन शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांच्यासाठी रोड शो करून मतदान करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री शिंदे यांची हि कृती आदर्श आचारसंहितेचा भंग करणारी असून मुख्यमंत्री शिंदे व दिलीप लांडेंविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १७१ व लोकप्रतिनिधी कायदा कलम १२६ नुसार एफआयआर दाखल करण्याचे निर्देश साकीनाका पोलीस स्टेशनला द्यावेत, अशी लेखी तक्रार मविआचे उमेदवार नसीम खान यांचे मुख्य पोलींग एजंट गणेश चव्हाण यांनी केली आहे.

निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, भारतीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदानाच्या दिवसापूर्वी ४८ तास इतर मतदार संघातील उमेदवार किंवा कोणतेही राजकीय नेते यांना स्वतःच्या मतदारसंघाव्यतिरिक्त इतर मतदार संघात प्रवेश करण्यास मनाई आहे. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदिवली मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांच्यासाठी मतदान सुरु असताना म्हणजे दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास काजुपाडा घास कंपाऊंड ते सेंट ज्युड हायस्कूल भागात रोड शो काढून शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले. रोड शो काढलेल्या भागात अनेक मतदान केंद्रे आहेत. हा आदर्श आचार संहितेचा उघड भंग असून ही अनधिकृत उपस्थिती गंभीर चिंता निर्माण करणारी तसेच मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकीला बाधा पोहचवणारी आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

3 तास ago

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

10 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago