मंगलदास बांदल यांच्या पत्नी आणि भावालाही ईडीने चौकशीला बोलावलं; ईडीच्या कोठडीत अजुन आठ दिवस बांदलाचा मुक्काम

शिरुर (तेजस फडके) पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या शिक्रापुर आणि हडपसर येथील दोन्ही निवासस्थानी (दि २०) ऑगस्ट रोजी ईडीने छापा टाकला. त्यानंतर रात्री उशिरा ईडीने चौकशीसाठी मंगलदास बांदल यांना चौकशीसाठी मुंबईला नेल्यानंतर काल (दि.२१) रोजी बांदल न्यायालयात हजर केले असुन बांदल यांचा पुढचा आठवडाभराचा मुक्काम ईडीच्या कस्टडीत असणार आहे. कारण (दि २९) रोजी पुन्हा न्यायालयात हजर करणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

तसेच याच प्रकरणी मंगलदास बांदल यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रेखा बांदल यांना देखील ईडीने चौकशीसाठी आज (दि. २२) रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर बांदल यांचे थोरले बंधू प्रताप बांदल यांनाही चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावण्यात आले आहे. शिवाजीराव भोसले बँकेच्या गैरव्यवहाराप्रकरणी मंगलदास बांदल यांना यापुर्वीही २१ महिने तुरुंगात काढावे लागले आहेत. याच प्रकरणी ईडीने बांदल यांना ताब्यात घेतले आहे.

 

शिरुर-हवेली मतदारसंघातील मोठं राजकीय व्यक्तिमत्त्व असलेले मंगलदास बांदल हे आलिशान कार आणि महागड्या वस्तूंचे चाहते आहेत. त्यामुळे बांदल यांच्या घरी जेव्हा ईडीने छापा टाकला तेव्हा चौकशी दरम्यान ५ कोटी ६० लाख रुपयांची रोकड, आलिशान कार, एक कोटी रुपयांची मनगटी घड्याळे आढळून आली आहेत.

 

बांदल यांच्यावर राजकीय द्वेषापोटी ईडीची कारवाई…?

यापुर्वी मंगलदास बांदल यांनी शिरुर तालुक्यातील राजकारणात अनेकांची धांदल उडवली आहे. तसेच बांदल यांनी यापुर्वी विधानसभा निवडणुक लढवलेली आहे. तसेच ते लोकसभेसाठीही इच्छुक होते. बांदल हे विरोधकांवर सडेतोड टिका करतात. सध्या ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत होते. त्यामुळे कदाचित राजकीय द्वेषापोटी तर बांदल यांना वारंवार अडचणीत आणण्याचा विरोधकांचा डाव नाही ना अशीही चर्चा दबक्या आवाजात शिरुर-हवेली मतदार संघात सुरु आहे.

मंगलदास बांदल यांच्या घरावर पुन्हा ईडीची धाड

मंगलदास बांदल यांना ईडीने केली अटक; कोट्यवधींचं घबाड

मंगलदास बांदल यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट; चर्चांना उधाण

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago