क्राईम

गुनाटमध्ये भरधाव मोटारसायकलची शाळकरी मुलाच्या सायकलला पाठीमागून धडक; बालक गंभीर जखमी…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : गुनाट ते शिंदोडी रस्त्यावर भरधाव आणि निष्काळजीपणे मोटारसायकल चालविणाऱ्या चालकाने सायकलवरुन जाणाऱ्या ११ वर्षीय मुलाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात सदर मुलगा गंभीर जखमी झाला असून, अपघात घडल्यानंतर जखमी बालकाला कोणतीही वैद्यकीय मदत न करता मोटारसायकल चालक घटनास्थळावरुन पसार झाला. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.

सदरची घटना दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सुमारे ४ वाजून १० मिनिटांच्या सुमारास शिरुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे गुनाट (ता.शिरुर) येथे गुनाट ते शिंदोडी रस्त्यावर घडली. या अपघातात कृष्णा विलास आडसुरे (वय ११, रा. शिंदोडी रोड, गुनाट, ता. शिरुर, जि. पुणे) हा बालक गंभीर जखमी झाला आहे. भरधाव मोटारसायकलने त्याच्या सायकलला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने त्याच्या डोक्याला, नाकाला, तोंडाला आणि हनुवटीला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच दोन्ही हात व पायांनाही दुखापत झाली असून, सायकलचेही नुकसान झाले आहे.

या प्रकरणी भाऊसाहेब पोपट आडसुरे (वय ४५, रा. गुनाट, ता. शिरुर) यांनी शिरुर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन बाल्य़ा चव्हाण (पूर्ण नाव माहीत नाही, रा. शिंदोडी, पो. निमोणे, ता. शिरुर, जि.पुणे) या मोटारसायकल चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम तसेच मोटार वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, संबंधित चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे मोटारसायकल चालविली. त्यातून बालकाच्या सायकलला पाठीमागून धडक बसली. विशेष म्हणजे, अपघातानंतर जखमी बालकाची विचारपूस करणे किंवा त्याला वैद्यकीय मदत मिळवून देण्याऐवजी चालकाने घटनास्थळावरुन पळ काढल्याचा आरोप आहे.

अपघात घडवून जखमीला मदतीसाठी वाऱ्यावर सोडून जाण्याचा हा प्रकार गंभीर असून, रस्त्यावरील वाहनचालकांच्या बेफिकीरपणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः गावांमधील रस्त्यांवरून लहान मुले सायकलने ये-जा करीत असताना वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे आणि वाहतुकीचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार प्रताप टेंगले हे करत आहेत.

शिरूर! मलठणमध्ये अष्टविनायक महामार्गावर कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू…

हृदयद्रावक! शिरूर तालुक्यात अखंड हरिनाम सप्ताहातून घरी परतणाऱ्या तिघांना ट्रकने चिरडले…

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

Video: शिरूर तालुक्यात भीषण अपघातात चिमुकल्याचा मृत्यू तर तिघे जखमी…

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

14 तास ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

1 दिवस ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

1 दिवस ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

1 दिवस ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

1 दिवस ago

मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप, आपच्या पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश!

राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…

1 दिवस ago