क्राईम

शिरूर! मलठणमध्ये अष्टविनायक महामार्गावर कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू…

मलठण (सुनिल जिते) : अष्टविनायक महामार्गावर भरधाव वेगाने वाहन चालविणे आणि ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न दोन तरुणांच्या जीवावर बेतल्याची दुर्दैवी घटना मलठण (ता. शिरूर) येथे घडली आहे.

स्नेहल हॉटेलसमोर रविवारी (ता. १) रात्री पावणे नऊच्या सुमारास एर्टिगा कारने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावर वाहन सोडून पसार झाला. अजय बाळू देवकर (वय २८, रा. कवठे येमाई) आणि किरण अर्जुन चोरे (वय २४, रा. डोंगरगण, चोरेवस्ती) अशी मृत तरुणांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलठण बाजूकडून कवठे येमाईच्या दिशेने मारुती सुझुकी एर्टिगा कार (एमएच ०३ ईएफ ६५५९) जात होती. यावेळी कारचालकाने भरधाव वेगात निष्काळजीपणे वाहन चालवत ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समोरून येणाऱ्या होंडा युनिकॉर्न दुचाकीला कारची जोरदार धडक बसली. धडकेमुळे दुचाकीवरील दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे, अपघात घडल्यानंतर कारचालकाने जखमींना वैद्यकीय मदत करण्याऐवजी तसेच पोलिसांना घटनेची माहिती न देता घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे अपघातानंतर जखमींना मदत न करता पसार झालेल्या चालकाच्या वर्तनाबाबत संताप व्यक्त होत आहे.

याप्रकरणी सुरेश मारुती चोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १००८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार कारचालकाचा शोध शिरूर पोलीस घेत असून, पोलीस उपनिरीक्षक खटिंग पुढील तपास करीत आहेत. या अपघातामुळे दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, अष्टविनायक महामार्गावरील भरधाव वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शिरुर तालुक्यात अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; बँकेतील तरुण कॅशियरचा दुर्दैवी मृत्यू

न्हावरे-काष्टी अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; पत्नीचा जागीच मृत्यू, पती जखमी

मलठण-कवठे येमाई अष्टविनायक रस्त्यावर वाढले अपघाताचे प्रमाण; ऊस वाहतूक…

करडे येथे अष्टविनायक महामार्गावर अपघातात तरुणाचा मृत्यू

अष्टविनायक महामार्गावर कवठे येमाई हद्दीत भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चिमुरडयासह तीन जणांचा करुण अंत

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

5 तास ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

18 तास ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

18 तास ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

1 दिवस ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

1 दिवस ago

मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप, आपच्या पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश!

राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…

1 दिवस ago