राजकीय

धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करणाऱ्यांवर शिंदेंची खरमरीत टीका; ‘उबाठा’वर निशाणा

नवी दिल्ली: “बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. ते देव्हाऱ्यात धनुष्यबाणाची पूजा करायचे. मात्र, २०१९ मध्ये बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्व आणि महाराष्ट्रातील जनतेचे बहुमत गोठवले. आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी केली जात आहे. बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाची भूमिका आणि धोरण पुसण्याचे काम सुरू आहे,” अशी खरमरीत टीका शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उबाठा)वर केली.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे मंगळवारी नवी दिल्ली येथे दाखल झाले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी उबाठावर निशाणा साधला.

‘सर्व प्रश्नांना उत्तर दिले जाईल’

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबत शिंदे म्हणाले, “राज्यघटना, पक्षाची घटना आणि निवडणूक आयोगाचे अधिकार या सर्व बाबी या प्रकरणात महत्त्वाच्या आहेत. शिवसेनेच्या वतीने युक्तिवाद सुरू झाल्यानंतर त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिले जाईल.”

दरम्यान, दिल्लीत शिवसेनेच्या राज्यप्रमुखांची बैठक होणार असून त्यामध्ये संघटनात्मक विषयांवर चर्चा केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

मोदींशी शिवरायांची तुलना आवडणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांचा दैवतासमान आदर केला आहे. नौदलाच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा प्रस्थापित करण्याचे कामही त्यांनी केले. मात्र, शिवरायांशी केलेली तुलना पंतप्रधानांनाही आवडणार नाही.”

सरकारी कार्यालयांमध्ये शिष्टाचारानुसार राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे फोटो लावले जातात, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजाबाबत सरकार सकारात्मक; आंदोलकांनीही सकारात्मक भूमिका घ्यावी

मराठा समाजाला १० टक्के आरक्षण, कुणबी प्रमाणपत्राच्या प्रश्नासाठी आयोगाची स्थापना, सारथी तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज अशा अनेक योजना मुख्यमंत्री असताना राबविल्या. आताही इतर कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला न्याय देण्याची महायुती सरकारची भूमिका आहे. जे कायदेशीर आणि न्याय्य आहे, ते देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनीही सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

4 तास ago

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

11 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago