राजकीय

शिरुर लोकसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाचा दावा…

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून आढावा घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघाची स्थिती संदर्भात उद्धव ठाकरे यांनी स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांकडून आढावा बैठकीत माहिती घेतली. उद्धव ठाकरेंकडून लोकसभा निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व लोकसभेच्या 48 जागांचा आढावा घेतला जात आहे.

मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिरुर लोकसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे. लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या कशाप्रकारे सीट निवडून येतील याबतात माहिती या बैठकीत घेतली. विधानसभेच्या मतदारसंघाचा देखील आढावा घेतला. सध्याची परिस्थिती आणि पाठीमागची परिस्थिती काय होती आणि कशाप्रकारे निवडणूक लढवून आपल्याला जागा जिंकता येईल? याबद्दलची माहिती उद्धव ठाकरे यांनी घेतली.

दरम्यान, शिरुर मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ राहिला आहे. त्यामुळे या जागेवर शिवसेनेनेच उमेदवारी लढवली पाहिजे, अशा प्रकारच्या भावना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. सध्या शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे हे खासदार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. सध्या आढळराव पाटील हे शिवसेनेच्या शिंदे गटात सामील झाले आहेत. यामुळे पुढील उमेदवार कोण असणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभा मतदारसंघ निहाय बैठकांचा धडाका सुरु आहे. 16 ऑगस्टपासून हे बैठकांचे सत्र सुरु आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 16 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. दरम्यान, भाजपविरोधी इंडिया आघाडीमध्ये आपण असल्यामुळं बारामतीत सुप्रिया सुळे यांना आपल्या पक्षाकडून ताकद द्या, त्यांना साथ द्या, अशा सूचना देखील उद्धव ठाकरेंनी नेत्यांना दिल्या आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाची ताकद किती यासंदर्भात विधानसभानिहाय सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात आपण कोणत्या विधानसभेच्या जागांसाठी विचार करु शकतो या संदर्भात सर्व नेत्यांना बैठकीत विचारणा करण्यात आली.

दरम्यान, खडकवासला विधानसभा मतदारसंघाची जागा ठाकरे गटाला मिळावी अशी इच्छा स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केली आहे. या लोकसभा मतदारसंघात आपण इतर विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ताकद देणार असू तर खडकवासला विधानसभा मतदारसंघासाठी आपण प्रयत्न करायला हवा असे म्हणणे देखील स्थानिक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

6 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

6 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

6 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

6 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

6 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

10 तास ago