मुंबई: शिवसैनिक हेच शिवसेनेचं ब्रम्हास्त्र आहे हे पुन्हा एकदा प्रभादेवी येथील घडलेल्या प्रकरणावरुन अधोरेखित झालं आहे. आमदार सदा सरवणकर बंदुकीचा धाक दाखवत असताना देखील निर्भीडपणे सामोरे गेलेल्या शिवसैनिकांच्या पाठीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कौतुकाची थाप दिली. पोलिसांनी या शिवसैनिकांना सोडल्यानंतर थेट मातोश्री येथे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली.
सदा सरवणकरच्या विरोधात तक्रार दाखल करायला गेलेल्या महेश सावंत यांच्यासह पाच शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली. त्यांना जेव्हा पोलिसांनी सोडलं त्यानंतर हे सर्व शिवसैनिक मातोश्रीवर पोहोचले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी या शिवसैनिकांचं कौतुक केलं.
दरम्यान, आदित्य ठाकरे स्वतः जमिनीवर बसत या शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांच्या बाजूला बसायला दिलं. शिवसैनिक ही शिवसेनेची ताकद आहे, शिवसेना हा एक परिवार आहे हेच आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या या कृतीतून दाखवून दिलं.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…