शिरुर शहरात युवकाला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

शिक्रापूर: शिरुर (ता. शिरुर) येथील सावतामाळी नगर येथे किरकोळ वादातून युवकाला बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे गोवर्धन नारायण साबळे व ऋषिकेश गोवर्धन साबळे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिरुर येथील रामलिंग रोड येथे राहणारे मिथुन सिंग व ऋषिकेश साबळे यांच्या मध्ये फोनच्या किरकोळ कारणातून वाद झाला होता. मात्र त्यांनतर ऋषिकेश याने मिथुनला मारहाण करण्यास सुरवात केली यावेळी मिथुनचे चुलते चंद्रपाल हे मध्ये आले असता ऋषिकेश साबळे व त्याचे वडील गोवर्धन साबळे या दोघांनी देखील मिथुन व त्याच्या चुलत्याला बेदम मारहाण करत जखमी करून शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत चंद्रपाल गजराज सिंग (वय ४८) रा. रामलिंग रोड शिरुर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी गोवर्धन नारायण साबळे व ऋषिकेश गोवर्धन साबळे दोघे रा. घोटीमळा (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक निलेश शिंदे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मालवणीत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा…

2 तास ago

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

17 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

17 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

17 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

17 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

17 तास ago