शिकापूर: जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे किरकोळ कारणातून महिलेसह तिच्या पती व मुलीला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ज्ञानदेव नामदेव ढोबळे, शुभम ज्ञानदेव ढोबळे, शेशराव ज्ञानदेव ढोबळे, देवगन ज्ञानदेव ढोबळे, कान्हू ज्ञानदेव ढोबळे, आशाबाई ज्ञानदेव ढोबळे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील केंदूर रोड येथे राहणाऱ्या नंदा वावरे यांच्या भाच्याला शेवगाव येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले असल्याने वावरे हे त्यांच्या घरातील पुरुषांना चला आपण भाच्याला भेटायला जाऊ, असे म्हणत असताना शेजारी राहणारा ज्ञानदेव ढोबळे हा व्यक्ती त्यांच्या भाच्याबाबत बरे-वाईट बोलू लागला. त्यामुळे नंदा वावरे यांनी असे बोलू नका म्हटल्याने ज्ञानदेव ढोबळे व त्याच्या कुटुंबीयांनी नंदा वावरे यांसह त्यांच्या पती व सुनेला शिवीगाळ, दमदाटी करत हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच काठीने बेदम मारहाण केली.
याबाबत नंदा भाऊसाहेब वावरे (वय ५०) रा. केंदूर रोड जातेगाव खुर्द (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. गोळेगाव ता. शेवगाव जि. अहमदनगर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी ज्ञानदेव नामदेव ढोबळे, शुभम ज्ञानदेव ढोबळे, शेशराव ज्ञानदेव ढोबळे, देवगन ज्ञानदेव ढोबळे, कान्हू ज्ञानदेव ढोबळे, आशाबाई ज्ञानदेव ढोबळे सर्व रा. केंदूर रोड जातेगाव खुर्द (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. गोळेगाव ता. शेवगाव जि. अहमदनगर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आजिनाथ शिंदे हे करत आहे.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…