शिरूर (अरुणकुमार मोटे): रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” या सामाजिक संदेशाला उजाळा देत सविंदणे (ता. शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात रविवारी (ता.३१) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्राच्या संचालिका पूर्वाताई दिलीपराव वळसे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिरूर-आंबेगाव महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा व माजी सरपंच शुभांगी पडवळ यांच्या पुढाकारातून हे शिबिर उत्साहात पार पडले.
शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे व सरपंच मनीषा नरवडे यांच्या हस्ते झाले. तब्बल ६१ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली. प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र व टी-शर्ट भेट देण्यात आले. विशेष म्हणजे लकी ड्रॉ मधून खंडू कारभारी लंघे (सविंदणे) व पियुष दिलीप पोखरकर (वडगाव पीर) हे भाग्यवान रक्तदाते सायकल बक्षिसाचे मानकरी ठरले. गावातील नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शिबिराला भव्य स्वरूप लाभले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, सरपंच मनीषा नरवडे, उपसरपंच गोरक्ष लंघे, माजी सरपंच सोनाली खैरे, वसंत पडवळ, भाऊसाहेब लंघे, मोहन किठे, चेअरमन शोभा लंघे, माजी चेअरमन रामदास पडवळ, ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष अरूणकुमार मोटे, बाळासाहेब भोर, बाळासाहेब लंघे, फकीरा लंघे, ग्रामपंचायत सदस्या मालुबाई मिंडे, माऊली पुंडे, पोपट पडवळ, पी.डी. नरवडे, वसंत नरवडे, चेतन पडवळ यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. सौरभ ढमढेरे, आरोग्य सेवक डॉ. विनायक गोसावी व सेविका तेजवंती नैताम यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब भोर यांनी केले तर आभार दिलीप नरवडे यांनी मानले.
शिरुर (तेजस फडके) ‘तुमच्याकडील सोन्यापेक्षा हे बिस्कीट अधिक वजनाचे आहे,’ असे भासवून महिलेचा विश्वास संपादन…
मुंबई: देशाच्या प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू…
राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…
मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…
संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…
मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…