क्राईम

इन्स्टाग्राम फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारल्याच्या रागातून तरुणावर हॉटेलमध्ये जीवघेणा हल्ला

शिरूर (अरुणकुमार मोटे): फक्त इन्स्टाग्रामवर पाठविलेली फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारल्याच्या कारणावरून शिरूर तालुक्यातील एका २१ वर्षीय तरुणावर चार जणांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी (दि. ३० सप्टेंबर) दुपारी अडीचच्या सुमारास डोंगरगण फाटा, हॉटेल स्वरा येथे घडली.

फिर्यादी रोहन मळीभाऊ खामकर (वय २१, व्यवसाय- वेल्डिंग, रा. शिनगारवाडी म्हसे बु.) याने शिरूर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, तो हॉटेल स्वरा येथे फॅब्रीकेशनचे काम करीत असताना आरोपी अमर मुंजाळ (रा. डोंगरगण), हर्षद खाडे, करण चव्हाण (दोघे रा. म्हसे बु.) व सचिन पवार (पत्ता अज्ञात) हे तिथे आले.

चार पाच दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर पाठविलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली नसल्याचा राग धरून संशयितांनी एकत्रितपणे रोहनवर लाकडी दांडके, हात व लाथाबुक्क्यांनी तुफान मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादीच्या हातावर, डोक्यावर व तोंडावर गंभीर दुखापती झाल्या.

याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून,या प्रकरणाचा तपास सहाय्यक फौजदार प्रशांत गायकवाड हे करत आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, सोशल मीडियावरील किरकोळ वाद किती गंभीर स्वरूप धारण करू शकतात याचे हे आणखी एक उदाहरण आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

23 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

23 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

24 तास ago