शिरूर तालुका

पिंपरखेडमध्ये एक मादी बिबट जेरबंद, बिबटयाची दहशत कायम

शिरुर (अरुणकुमार मोटे): पिंपरखेड (ता. शिरुर) येथे बिबट्याने महिलेवर हल्ला केलेल्या परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात 6 ते 7 वर्षाची मादी जातीचा बिबट्या जेरबंद झाला आहे. एक बिबट जेरबंद झाला असला तरी ‘भय इथले संपत नाही’ अशी परीस्थिती येथील परिसरात कायम असून बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर उभे टाकले आहे.

बुधवार (दि. 1) रोजी रात्री पुजा जालिंदर जाधव (वय २२) या महिलेवर बिबट्याने हल्ला केला होता यामध्ये या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पिंपरखेड येथील बोंबे- कुऱ्हाडे वस्तीच्या परिसरात वनविभागाकडून पिंजरे लावण्यात आले आहे. घटना घडलेल्या ठिकाणापासून 350 फुटावर विकास साहेबराव बोंबे यांच्या शेतात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात रविवारी (दि. ५) पहाटे 4 वाजता 1 बिबट्या अडकला.

पिंजऱ्यात अडकलेला मादी बिबट शांत वाटत असल्याने कैद झालेला बिबट हा नरभक्षक वाटत नसल्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहे. या परिसरातील नागरिक प्रंचड दहशतीखाली आहेत.पिंजऱ्यात कैद झालेल्या बिबट्याची माणिकडोह बिबट निवारण केंद्रात रवानगी करण्यात आली असल्याचे वनविभागाचे वनरक्षक लहू केसकर, महेंद्र दाते यांनी सांगितले.

घटनास्थळी लावण्यात आलेल्या पिंजऱ्याच्या बाजूला स्वंयचलित कॅमेरा ट्रॅपमध्ये ही मादी कैद झाली होती.तेथील हालचालीचे निरिक्षण पहाता हा हल्ला करणारा बिबट्या आहे. पकडलेल्या बिबट्याचे ठसे आणि हल्ला करणाऱ्या बिबट्याचे ठसे वनविभागाचे संबंधित तज्ञ, वैद्यकीय अधिकारी यांच्या कडून तपासणी केल्यानंतर तो नरभक्षक आहे का ते निश्चित होईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

7 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

7 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

7 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

7 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

12 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

13 तास ago