मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय ‘कमळी’ मालिकेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, या भागातून कथानकाला नवं आणि महत्त्वपूर्ण वळण मिळणार आहे.
सध्या कमळी आणि तिची आई हृषीसोबत इनामदारांच्या घरी राहत आहेत. हॉस्टेलमधून बाहेर पडल्यामुळे त्यांच्यासमोर दुसरा पर्याय उरलेला नसतो. मात्र, डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे कमळीच्या आईला स्मृतीभ्रंश झाला असून, कमळी हीच तिची मुलगी आहे हेही तिला आठवत नाही. आपल्या आईची स्मृती परत यावी, तिने पुन्हा सर्व काही ओळखावं, यासाठी कमळी देवाकडे प्रार्थना करत आहे.
दरम्यान, आषाढी विशेष भागात सरोज महाजनांच्या घरी येणार असून, तिच्या आगमनामुळे अनेक गूढ प्रश्न निर्माण होणार आहेत. राजन आणि अन्नपूर्णा यांच्यासमोर कमळी हीच महाजन कुटुंबाची खरी नात असल्याचं सत्य उलगडणार का, याची उत्सुकता वाढली आहे.
या विशेष भागाच्या चित्रीकरणाबद्दल बोलताना कमळीची भूमिका साकारणारी अभिनेत्री विजया बाबर म्हणाली, “आषाढी एकादशीमुळे सेटवर अत्यंत भक्तिमय वातावरण होतं. आरती, अभंग आणि टाळ-मृदुंगाच्या गजरामुळे संपूर्ण टीममध्ये सकारात्मक ऊर्जा संचारली होती. कॅमेरा बंद असतानाही आम्ही अभंग म्हणत होतो, गाणी गात होतो आणि टाळांच्या तालावर नाचत होतो. या भागात कमळीला सरोजबद्दल एक महत्त्वाचा धागा मिळतो. सरोज एका कारच्या मागे धावत असल्याचं कमळी पाहते आणि त्यातून पुढील कथानकाला नवं वळण मिळणार आहे.”
सरोज म्हणजेच कमळीची आई गौरी महाजन कुटुंबात आल्यानंतर पुढे नेमकं काय घडणार? कामिनी, रागिणी आणि अनिकाला सत्य समजणार का? तसेच कमळी हीच महाजन कुटुंबाची खरी वारसदार असल्याचा उलगडा कधी होणार, याची उत्तरं आगामी भागांमध्ये मिळणार आहेत.’कमळी’ मालिका झी मराठीवर दररोज रात्री ९ वाजता प्रसारित होते. मालिकेत विजया बाबर, निखिल दामले, केतकी कुलकर्णी आणि ईला भाटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…