कान्हूर मेसाईचे सुभेदार मनोजकुमार दळवी यांचा भव्य सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न
कान्हूर मेसाई (सुनील जिते): कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील रहिवासी व भारतीय लष्करातील सुभेदार मनोजकुमार दळवी यांनी तीस वर्षांची प्रदीर्घ आणि निष्ठावान लष्करी सेवा पूर्ण करून नुकतीच निवृत्ती स्वीकारली. त्यांच्या या गौरवपूर्ण सेवेच्या सन्मानार्थ रविवारी (ता. ११) गावकऱ्यांच्या वतीने भव्य मिरवणूक आणि सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
सकाळी गावातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीनंतर मेसाई कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ग्रामस्थांनी सुभेदार दळवी यांचा कुटुंबीयांसह सपत्नीक सत्कार केला. देशसेवेसाठी आयुष्याची तीन दशके अर्पण करणाऱ्या या वीर जवानाच्या सत्कारप्रसंगी उपस्थितांचे डोळे भरून आले होते.
सीमेवर आहोरात्र देशाच्या संरक्षणासाठी सज्ज असणाऱ्या सैनिकांप्रती समाजमनात असलेला आदर निवृत्तीनंतरही कायम राहतो, याचे जिवंत उदाहरण कान्हूर मेसाई गावकऱ्यांनी दाखवून दिले. सुभेदार दळवी हे १ जानेवारी रोजी निवृत्त होऊन गावात परतल्यानंतर ग्रामस्थ व कुटुंबीयांनी एकत्र येत त्यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला.या कार्यक्रमास कान्हूर मेसाई व पंचक्रोशीतील आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, युवक, महिला तसेच लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती.
“गावच्या वतीने झालेला सेवापूर्ती सत्कार पाहून मी भारावून गेलो आहे. तीस वर्षे घरापासून दूर राहून लष्करात सेवा करताना हे केवळ नोकरी म्हणून पाहिले नाही, तर मातृभूमीची सेवा मानली. या प्रवासात जन्मदात्या आईचा आणि अर्धांगिनीचा त्याग नेहमीच मनात होता. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी प्रामाणिकपणे देशसेवा करू शकलो. पुढील काळात गावाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहीन.”
सुभेदार मनोजकुमार दळवी
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…