मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात वाळू उपशावरुन दोन गट आमनेसामने; फायटर व दगडांनी हल्ला…

गायराणात विरोध केल्याने युवकावर काठी-दगडांनी हल्ला

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील चिंचणी गायराण परिसरात सुरु असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावरुन वाद चिघळून थेट मारहाणीपर्यंत गेला असून, वाळू उपसा रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकावर काठी, फायटर व दगडांनी हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना १३ जानेवारी रोजी रात्री घडली आहे. या घटनेत एक युवक जखमी झाला असुन, कारचेही नुकसान करण्यात आले आहे.

विजय मोहन पवार (वय ३२, रा.चिंचणी, ता. शिरुर) हे शेती व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. चिंचणी गायराण परिसरात साद फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपण व गायराण साफसफाईचे काम सुरु असून, त्याच भागात वाळू उपसा होत असल्यास लक्ष ठेवण्याच्या सूचना ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंचांनी गावकऱ्यांना दिल्या होत्या.

दि. १३ जानेवारी २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास विजय पवार व त्यांचा मित्र अजय धावडे हे चिंचणी गायराण परिसरात असताना वाळूने भरलेला हायवा नदीकडे जाताना दिसला. त्याचा पाठलाग केल्यानंतर एका बोटीवरून वाळू उतरवली जात असल्याचे आढळून आले. त्यांनी बोटीवरील मजुरांना वाळू खाली करू नका असे सांगून तात्काळ ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना माहिती दिली.

या प्रकाराचा राग मनात धरुन लगडवाडी येथील लक्ष्मण कोळपे याने फोनवर शिवीगाळ व धमकी देत गायरानात बोलाविले, असा आरोप फिर्यादीने केला आहे. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास चिंचणी-लगडवाडी रस्त्यावर लक्ष्मण कोळपे, विजय कोळपे व संतोष कोळपे यांनी विजय पवार यांना अडवून डोक्यावर काठी, फायटर व दगडाने मारहाण केली. हनुमंत कोळपे यानेही दगडफेक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

यावेळी अजय धावडे यांनाही शिवीगाळ, दमदाटी करण्यात आली असून, लक्ष्मण कोळपे याने अजय धावडे यांच्या मांडीला चावा घेत जिवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप आहे. हल्ल्यादरम्यान विजय पवार यांच्या इर्टीगा कार (एम.एच. १२ डब्ल्यू.ई. ५४८४) चा मागील इंडिकेटर व टेललॅम्प फोडून नुकसान करण्यात आले. या घटनेनंतर नागरिकांनी हस्तक्षेप करुन भांडण थांबवले. जखमींना ग्रामीण रुग्णालय शिरुर येथे उपचार देण्यात आले असून, विजय पवार यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या घटनेमुळे चिंचणी गायरान परिसरातील वाळु उपशावरुन वाढणारे तणाव, दोन गटांतील संघर्ष आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बेकायदेशीर वाळू उपसा थांबवण्यासाठी प्रशासनाने ठोस व कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

शिरुर तालुक्यात वाळू माफियाचा हैदोस; शेतकऱ्याच्या कुटुंबासह ६ महिन्यांच्या गरोदर महिलेवर जीवघेणा हल्ला…

Video: ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या बातमीचा दणका; महसुल विभागाने वाळूच्या बोटी फोडल्या…

Video; महसुल, पोलिस आणि सरपंचाचा बसलाय मेळ त्यामुळे घोड धरणात चाललाय वाळू उपशाचा खेळ

शिरुर तालुक्यात गावठी कट्टे आणण्यासाठी वाळू माफिया वापरत असलेल्या गाडीचा वापर..? नागरिकांमध्ये कुजबुज

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

3 मिनिटे ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

9 मिनिटे ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

14 मिनिटे ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

53 मिनिटे ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

6 तास ago

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

13 तास ago