शिक्रापूर (शेरखान शेख): राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांतर्गत २०१९ ते २०२०, २०२० ते २०२१ व २०२१ ते २०२२ च्या पुरस्कारांसाठी ज्या खेळांच्या फेडरेशन कप स्पर्धा होतात त्यामध्ये सहभागी तसेच प्राविण्य प्राप्त खेळाडूंनी ३१ मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन सहसंचालक क्रीडा व युवक सेवा चंद्रकांत कांबळे यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
फेडरेशन कप स्पर्धांचे गुणांकन होत नसल्यामुळे काही खेळाडू शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन २०१९ ते २०२०, २०२० ते २०२१ व २०२१ ते २०२२ या तीन वर्षाकरीता अर्ज सादर करू शकले नाहीत.मात्र अशा खेळाडूंचे नुकसान होऊ नये व खेळाडू पुरस्कारा पासून वंचित राहू नये यासाठी सदर अर्ज मागविण्यात आले असून अशा खेळाडूंनी त्यांचे प्रस्ताव व विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेकडे सादर करणे गरजेचे असून पुरस्कारासाठीचे अर्ज आणि माहिती क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अशी माहितीही देखील क्रीडा विभागाने दिली आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…