शिरूर तालुका

शिक्रापूरच्या अविनाश थोरात व रज्जाक शेख यांना पदोन्नती

पुणे जिल्ह्यातील ६३ सहाय्यक फौजदार बनले पोलीस उपनिरीक्षक

शिक्रापूर (शेरखान शेख): पोलीस दलातील पोलिसांच्या सेवा कार्यकाळानुसार पोलिसांना बढती मिळत असताना पुणे जिल्ह्यातील तब्बल त्रेसष्ट सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांच्या पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झालेली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश चांगदेव थोरात व रज्जाक अकबर शेख या दोघांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश चांगदेव थोरात व रज्जाक अकबर शेख या दोघांनी यापूर्वी पुणे जिह्यातील अनेक पोलीस स्टेशन मध्ये कर्तव्य बजावत वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी विशेष कामगिरी केली असून नुकतीच त्यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरुन पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाली असल्याबाबतची ऑर्डर पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी जाहीर केली.

पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती बद्दल शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, नितीन अतकरे, रणजीत पठारे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात व रज्जाक शेख यांचा सन्मान करण्यात आला असून पदोन्नती बद्दल सर्वांचे पुणे जिल्ह्यातील कौतुक होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

13 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

13 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

13 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

13 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

19 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

20 तास ago