शिरूर तालुका

शिरूर-हवेलीत पूरग्रस्त मदतीसाठी चंदन सोंडेकर यांचे आवाहन!

शिक्रापूरः पुणे जिल्ह्यासह शिरूर व हवेलीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांसह अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिरूर-हवेली मतदारसंघात नागरिकांना पूर परिस्थितीत काही अडचण आल्यास मदतीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे माजी प्रदेश प्रवक्ता चंदन सोंडेकर यांनी केले आहे.

पुणे जिल्हा व शहरामध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळे पुणे शहर व जिल्ह्यातील शाळांना शुक्रवारी (ता. २६) सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. पुणे हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. बुधवारी (ता. २४) रात्रीपासून पुणे शहरासह जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

चंदन सोंडेकर यांनी म्हटले आहे की, ‘शिरुर हवेली मतदारसंघातील सर्व नागरीकांना सूचित करतो की जिल्हाधिकारी यांनी घाटमाथ्यावरील भोर वेल्हा मुळशी खेड या तालुक्यांना अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. यामध्ये शिरूर व हवेलीचा समावेश नसला तरी भिमा खोर्‍यातील घोड, भिमा, भामा, इंद्रायनी चंद्रभागा, मुळा, मुठा या शिरुर हवेलीतील नद्यांमधून अतिवृष्टीमूळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालू आहे. नदीकाठावरील गावांनी त्याबाबत काळजी घ्यावी. अतिवृष्टीत मदतीसाठी ज्या प्रमाणे पुणे महापालिकेने आपत्कालीन परिस्थितीत संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत. त्याप्रमाणे पुणे जिल्हा परिषदेने अद्यापपर्यंत आपत्कालीन मदतीसाठी संपर्क क्रमांक जाहीर केलेले नाहीत. शिरुर-हवेली मतदारसंघा अंतर्गत नागरिकांना पूर परिस्थितीत काही अडचण आल्यास माझ्याशी 9822090654 या क्रमांकावर संपर्क केल्यास मी मदतीसाठी उपलब्ध आहे.’

‘आंधळ दळतंय आण कुत्रं पिठ खातयं,’ अशी शिरुर-हवेलीत परिस्थिती : चंदन सोंडेकर

चंदन सोंडेकर यांनी घेतली शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट; अन् तत्काळ पत्र…

शिरूर भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांची आमदारकीचे इच्छुक उमेदवार चंदन सोंडेकर यांनी घेतली भेट…

शिरुर तालुक्यात विभागीय कृषी सहसंचालक यांचे बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

8 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago