कौतुकास्पद; शिरुर पोलिसांची दारुवर मोठी कारवाई दारुसह ७५ लाखांचा ऐवज केला जप्त

शिरुर (अरुणकुमार मोटे): पुणे-नगर महामार्गावर शिरुरच्या नजीक असणाऱ्या बोऱ्हाडे मळा येथे गोव्याहुन महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी अवैध दारुची वाहतुक करणारा ट्रक शिरुरच्या पोलीस पथकाने पकडला असुन त्याच्याकडुन १ हजार ५० बॉक्स रॉयल ब्लू दारू किंमत ६० लाख ४८ रुपयांची व पंधरा लाख रुपयांचा ट्रक असा एकुण ७५ लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला असुन यात एक जणांला अटक करण्यात आली असल्याची माहिती शिरुरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे.

शिरुर पोलिसांनी मोहम्मद इम्रान मोहम्मद सलिम शेख (वय ३७, रा . घाटकोपर मुंबई) या ट्रक चालकाला अटक केली असुन याबाबत शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार शेखर झाडबुके यांनी फिर्याद याबाबत फिर्याद दाखल केली आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज (दि १०) मार्च रोजी सायंकाळच्या दरम्यान न्हावरे फाटा येथे शिरुर पोलीस स्टेशनचे ट्राफिक पोलीस अंमलदार शेखर झाडबुके व पोलिस अमलदार आप्पासाहेब कदम हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की चौफुल्यावर शिरुरकडे येणाऱ्या ट्रक मध्ये दारुची वाहतूक होत आहे.

पोलीस कर्मचारी झाडबुके व कदम यांनी शिरुरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना याबाबत माहिती सांगितली. त्यानंतर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलिस अंमलदार शेखर झाडबुके, आप्पासाहेब कदम महिला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, पोलीस हवालदार निरज पिसाळ या पथकाने बोऱ्हाडे मळा येथे बातमीदाराने दिलेल्या माहितीवरुन चौफुला-शिरुर रस्त्याहुन शिरुरकडे येणारा ट्रक क्रमांक एम एच ४८ सी बी ३६०५ याचा चालक पोलिसांना पाहताच संशयास्पद हालचाल करु लागला.

त्यामुळे पोलिसांना त्याचा संशय आल्याने पोलिसांनी ट्रक थांबवला त्यावेळेस त्यातून दारुचा वास येत असल्याचे पोलिसांना जाणवले. त्यानंतर ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये जुन्या कपड्यांच्या गाठोड्या पाठीमागे दारुसारखे बॉक्स दिसून आले. त्याची पाहणी केली असता ट्रकमध्ये गोव्याहून आणलेले गोवा रॉयल ब्ल्यू दारुचे १०५० बॉक्स रॉयल ब्ल्यू दारुचे बॉक्स किंमत ६० लाख ४८ हजार रुपये व १५ लाख रुपये त्या ट्रक असा एकूण ७५ लाख ४८ ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी ट्रकचा चालक याला शिरुर पोलिसांनी ताब्यात घेतले. शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्यादीवरुन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

10 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago