शिरूर तालुका

जागतिक महिलादिनी ‘छावा’ च्या स्क्रिनिंगचे आयोजन

शिरूर (अरुणकुमार मोटे): महिला दिनानिमित्त स्वराज्य रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष तेजस यादव यांच्या संकल्पनेतून स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील शेकडो महिलांनी आपल्या व्यस्त संसारातून वेळ काढून हा अनोखा महिलादिन साजरा केला.

‘स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी कशा प्रकारे स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी कष्ट घेतले व त्यांच्या धर्मपत्नी श्री सखी येसूबाई यांचा या स्वराज्याच्या भक्कम वाटचालीत एक महिला म्हणून कशी साथ लाभली याचा वस्तुपाठ या चित्रपटात आहे. त्यामुळे महिलादिनी हा चित्रपट महत्त्वाचा ठरतो. यामुळेच आम्ही महिलांसाठी या स्क्रिनिंगचे आयोजन केले. यानिमित्ताने संसारात रमलेल्या या आमच्या लाडक्या माता भगिनींनी एक दिवस मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहुन अनोखा महिलादिन साजरा केल्याचे’ आयोजक तेजस यादव यांनी सांगितले.

यावेळी निमगाव म्हाळुंगीच्या मा. उपसरपंच सौ. अश्विनीताई लांडगे, मा. उपसरपंच सौ. कविता चौधरी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एकनाथ लांडगे, अजित चौधरी, शिवसेना शाखाप्रमुख दशरथ नागवडे, अरविंद भिवरे, सागर नागवडे, भरत काळे, सुखदेव रणसिंग, नरेंद्र गडदे, प्रसन्न चव्हाण तसेच सर्व महिला व माता भगिनी यावेळी उपस्थित होत्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

11 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago