शिरूर तालुका

शिरुर तालुका माजी सैनिक संघटनेच्या अध्यक्षपदी धुमाळ

शिक्रापूर: शिरुर तालुका माजी सैनिक संघटनेची बैठक नुकतीच संपन्न झाली असून यावेळी शिरुर तालुका माजी सैनिक संघटनेच्या अध्यक्षपदी संभाजी धुमाळ तर उपाध्यक्षपदी भाऊसाहेब सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.

शिरुर तालुका माजी सैनिक संघटनेची बैठक ज्येष्ठ माजी सैनिक शिवाजीराव कोहोकडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी सैनिक संघटनेच्या शिरुर तालुकाध्यक्ष पदी संभाजी धुमाळ, उपाध्यक्षपदी भाऊसाहेब सोनवणे, मानद सचिवपदी रावसाहेब आदक, मानद खजिनदार पदी लहू तळोले, सदस्यपदी सुरेश उमाप, राजाराम सांबारे, परशुराम शिंदे, विलास शिवले, नंदकिशोर रोडे, जयसिंग गायकवाड, रमेश खर्डे, सुनील चौधरी, जालिंदर ढमढेरे, सुदाम भुजबळ यांची निवड करण्यात आली.

unique international school

दरम्यान निवडी नंतर बोलताना संघटनेच्या माध्यमातून माजी सैनिकांच्या समस्या शासन दरबारी मांडून सोडवणार असल्याचे माजी सैनिक संघटनेचे शिरुर तालुकाध्यक्ष संभाजी धुमाळ यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब आदक यांनी केले तर प्रास्ताविक माजी सैनिक सुरेश उमाप यांनी केले आणि राजाराम धुमाळ यांनी आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

15 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago