शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील समता शिक्षण संस्थेच्या आनंदाश्रम प्राथमिक शाळेतील तब्बल 220 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील समता शिक्षण संस्थेच्या आनंदाश्रम प्राथमिक शाळेत पुणे येथील ब्रेन बीज सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने विद्यार्थ्यांना दोन गणवेश, रेनकोट, बूट, स्वेटर यांसह पहिली ते सातवी पर्यंतच्या प्रत्येक वर्गाला एक लॅपटॉप असे शैक्षणीक साहित्य वाटप करण्यात आले असून सदर साहित्याचे वाटप ब्रेन बीज सोल्युशन प्राइवेट लिमिटेड कंपनीचे मंजुळा राव यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी समता शिक्षण संस्थेचे सुनील कामत, ॲड. प्रतिभा गवळी केशव पवार, संदीप गोसावी, विजया अहिरे, शशिकला खेडेकर, दिलीप गायकवाड यांसह आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर शिंदे यांनी केले, तर प्रास्ताविक विजय भोर यांनी केले आणि निलेश देसले यांनी आभार मानले.
थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…
केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…
मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…
मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…