शिरूर तालुका

नशिबाने दिलेले हिरावले आणि पुन्हा बहाल केले

मिडगुलवाडीच्या राजेंद्र पिंगळे या युवकाची संघर्षगाथा

शिक्रापूर (शेरखान शेख): माणसाच्या जीवनात प्रयत्नांना नशिबाची जोड मिळाली की यशाचा राजमार्ग सापडतो हे खरे असून कधी कधी मिळालेली एखादी गोष्ट नशिबात नसेल तर तोंडचा घास हिरावला जातो. मिडगुलवाडी येथील राजेंद्र पिंगळे या युवका बाबत घडलेला हा प्रसंग असून जीवनातील कसोटी पाहणाऱ्या वेदनादायी प्रवासात अत्यंत संयम आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्याने मात केली तसेच मित्रांनी सतत पाठबळ दिले आणि नुकताच राजेंद्र पिंगळेची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे.

मिडगुलवाडी (ता. शिरुर) या दुर्गम भागातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रपंच चालवणारा राजेंद्र पिंगळे घरची शेती थोडीफार मात्र पाणी नाही, मग गृहरक्षक दलात काम केले तुटपुंज्या पगारात भागेना, घरी आई वडील,पत्नी व दोन मुले मागील काळात मिडगुलवाडीच्या कामगार पोलीस पाटील पदावर परीक्षा देऊन नियुक्ती झाली परंतु काही असंतुष्ट स्पर्धकांनी अडचणी आणल्या. त्याने मॅजिक बस फाऊंडेशनच्या शैक्षणिक कार्यात जेमतेम पगारावर नोकरी स्वीकारली. त्यानंतर मात्र अत्यंत संयमी स्वभाव असल्याने संघर्ष करत पोलीस दलात जाण्याचे स्वप्न उराशी कवटाळले.

२०१९ च्या पोलीस भरतीत पुणे लोहमार्ग पोलीस दलात प्रतीक्षा यादीत नाव आले, त्यावेळी निवड झालेल्या एका उमेदवाराच्या कागदपत्रात त्रुटी असल्याने राजेंद्र पिंगळे यांना नियुक्तीचे पत्र आले, सर्वांना खूप आनंद झाला, शाळेने, गावाने अभिनंदनाचे फ्लेक्स लावले. वैद्यकीय तपासणी होत कागदपत्रांची छाननी झाली. मात्र यावेळी ज्याच्या जागी नेमणूक झाली तो उमेदवार मॅटमध्ये गेला अन निकाल त्याच्या बाजूने लागला.

सर्वांना तोंडघशी पडल्यासारखे झाले परंतु दुःख सांगणार तरी कोणाला, हातातोंडाशी आलेला घास नशिबाने हिरावून घेतला मात्र पण गडी हरला नाही. पुन्हा जिद्द बाळगली अभ्यास सुरूच ठेवला. पुण्यात अपयश आल्याने मुंबईचा आधार होता. वयाने बत्तीशी गाठलेली मागे मुलेबाळे. मुंबईचा पेपर दिला गृहरक्षक दलाचा कट ऑफ ११४ आला राजेंद्रला ११४ मार्क परंतु ११४ गुण मिळविलेले १६ विद्यार्थी त्यातून फक्त दोन निवडायचे यावेळी मात्र नेहमी हुलकावणी देणाऱ्या नशिबाने साथ दिली व जन्मतारखेनुसार 2 जागांपैकी पहिली जागा राजेंद्रला मिळाली, अखेर संघर्षाला यश आले व मुंबई पोलीस दलात पिंगळे यांची शेवटच्या क्षणी निवड झाली.

यश अपयशाचा हिंदोळ्यावर कान्हूरच्या अभ्यासिकेत मित्र अशोक मिडगुले, अमोल मिडगुले, आकाश गाजरे आणि प्राचार्य अनिल शिंदे यांनी मोलाची साथ दिली असून पत्नीने पाठबळ दिले त्यातून यशाचा मार्ग सुकर झाला असे मुंबई पोलीस दलात भरती झालेल्या राजेंद्र पिंगळे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

12 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago