शिरुर तालुक्यातील त्या ग्रामपंचायत सदस्यांना बडतर्फ करा…

सुधीर ढमढेरे यांची पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी मागणी

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) ग्रामपंचायतच्या सात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांकडून कर वसुली सुरु केली. मात्र 2 वर्षा पासून 7 ग्रामपंचायत सदस्यांनी कराचा केला नसल्याचे उघड झाले असल्याने सदर 7 सदस्यांना ग्रामपंचायत सदस्य पदावरुन बडतर्फ करावे, अशी मागणी सुधीर ढमढेरे यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असल्याने तळेगाव ढमढेरेत खळबळ उडाली आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामस्थ खाते दारांकडून कर वसुलीला सुरुवात केली आहे. मात्र २०२१ ते २०२२ व २०२२ ते २०२३ या कालावधीमध्ये ग्रामपंचायत सदस्यांनी भरलेल्या करा सह कर थकीत असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी माहिती सुधीर शरदराव ढमढेरे यांनी माहिती अधिकारातून मिळवली असता ग्रामपंचायत सदस्य असलेल्या कोमल गजानन शिंदे, कीर्ती प्रशांत गायकवाड, नवनाथ सुभाष ढमढेरे, आरती महेश भुजबळ, दिपाली संभाजी ढमढेरे, विलास भिकोबा आल्हाट व अनिल जयवंत भुजबळ या सात ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचा कर भरणा केला नसल्याचे उघड झाले.

सदर सदस्यांना यापूर्वी कर भरणा करण्याबाबतची नोटीस देऊन देखील त्यांनी कर भरणा केला नसल्याने त्यांना तत्काळ ग्रामपंचायत सदस्य पदावरुन बडतर्फ करा अशी मागणी सुधीर शरदराव ढमढेरे यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

कर थकीत मध्ये बडे पदाधिकारी…

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) ग्रामपंचायतचा करत थकलेले ग्रामपंचायत सदस्य यांनी यापूर्वी सरपंच, उपसरपंच पदासह शिरुर तालुक्याचे वेगवेगळे सभापती पदावर काम केलेले असून त्यांनीच कर थकवल्याने आच्छर्य व्यक्त केले जात असून सर्वसामान्य नागरिकांनी काय कटावे अशी चर्चा रंगली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…

12 तास ago

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

19 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

19 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

19 तास ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

20 तास ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

21 तास ago