शिरूर तालुका

लग्न समारंभात हाणामारी; एका तरुणास पोलिस कर्मचारी व साथीदारांची मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील आमदाबाद फाटा येथील मळगंगा लॉन्स येथे सुरु असलेल्या लग्न समारंभात अचानक वाद पेटल्याने जोरदार हाणामारी झाली. एका तरुणास HR सोबत फिरत असल्याच्या कारणावरून पारगाव पोलिस स्टेशन येथील कार्यरत पोलिस कर्मचारी चंद्रकांत गव्हाणे व तीन अज्ञात व्यक्तींनी शिवीगाळ करत मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याने या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

फिर्यादी अक्षय फक्कड गि-हे (वय २४), व्यवसाय लेबर कॉन्ट्रक्टर, रा. तडोंबाचीवाडी, शिरूर, यांनी दिलेल्या माहितीवरून शिरूर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पप्पु अंबादास पवार, सुरंजन बिजम गव्हाणे, पोलीस कर्मचारी चंद्रकांत सुभाष गव्हाणे, प्रविण अंबादास पवार (सर्व रा. आण्णापुर, ता. शिरूर, जि. पुणे) तसेच अन्य तीन अनोळखी व्यक्तींचा यात समावेश आहे.

हि घटना ३० एप्रिल २०२५ रोजी दुपारी ३:४५ च्या सुमारास घडली आहे. फिर्यादी अक्षय गि-हे हे अजय गव्हाणे आणि विशाल पवार यांच्यासोबत अजय प्रकाश गव्हाणे यांच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी मळगंगा लॉन्स येथे गेले होते. यावेळी पप्पु पवार आणि सुरंजन गव्हाणे यांनी विशाल पवार यास “तु HR सोबत का फिरतो…?” असा जाब विचारत त्याला धमकावले आणि शिवीगाळ केली.

या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या फिर्यादी आणि अजय गव्हाणे या दोघांना आरोपींनी त्यांच्या इतर साथीदारांना फोन करून बोलावून घेतले व त्यानंतर सात जणांनी मिळून दोघांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. “तुमचा इथे काय संबंध…? निघून जा नाहीतर खल्लास करून टाकू” अशा शब्दांत धमकी देत त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. यावेळी उपस्थित नातेवाईकांनी हस्तक्षेप करून दोघांना वाचवले. फिर्यादीने घडलेल्या प्रकारामुळे घाबरून लगेच तक्रार न दाखल करता नंतर कुटुंबीयांनी धीर दिल्यानंतर शिरूर पोलीस ठाण्यात हजर राहून गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस हवालदार उबाळे हे करत आहेत.

शिरूर पोलिसांकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असुन आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे सामाजिक कार्यक्रमांमध्ये वाढणाऱ्या वादांच्या घटना पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांकडूनच जर असे हल्ले होत असतील तर न्याय मागायचा कुणाकडे…? पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक तसेच पोलीस उपअधीक्षक यांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Video; पुणे-नगर रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटले अन फॉर्च्यूनर घुसली थेट गाळ्यात

शिरुर तालुक्यात ६० हजारांची लाच घेतल्याने लाचलुचपत विभागाची ग्रामसेवक महिलेवर कारवाई

Video; रांजणगाव MIDC तील MEPL च्या प्रश्नावर खासदार डॉ अमोल कोल्हे आक्रमक

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिसांची तत्परता; हरवलेली वृद्धाची बॅग एका तासात शोधून केली स्वाधीन

शिरुर (तेजस फडके) एका वृद्ध व्यक्तीची हरवलेली बॅग तत्परतेने शोधून अवघ्या एका तासात संबंधित व्यक्तीच्या…

13 तास ago

फडणवीसांइतकेच विलासराव देशमुखही माझे आवडते मुख्यमंत्री; मुरलीधर मोहोळांचं मोठं वक्तव्य

पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच…

18 तास ago

शेरखान शेख यांनी लिहिलेल्या ‘अनुभवांच्या पाऊलखुणा’ पुस्तकाचे प्रकाशन!

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…

20 तास ago

शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…

21 तास ago

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

1 दिवस ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

1 दिवस ago