मुख्य बातम्या

Video; पुणे-नगर रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटले अन फॉर्च्यूनर घुसली थेट गाळ्यात…

शिरुर (तेजस फडके) पुणे-नगर महामार्गावर कायमच अपघात घडत असतात. पण त्यातले काही अपघात एकदम विचित्र असतात. पुणे-नगर महामार्गावर सरदवाडी (ता.शिरुर) येथे काही दिवसांपुर्वी पुण्यावरुन नगरकडे जाणारा एक कंटेनर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका गाळ्यात शिरला होता. हा सर्व प्रकार ग्रामपंचायतच्या सिसीटिव्ही मध्ये कैद झाला होता.

असाच एक विचित्र अपघात सरदवाडी येथे घडला असुन आज रविवार (दि ४) रोजी पहाटे ४ च्या सुमारास नगर-पुणे महामार्गावर शिरुरवरुन पुण्याला जाणारी एक टोयाटो कंपनीची फॉर्च्यूनर (एम एच १२ टि के ८२३२) या चारचाकी गाडीचे नियंत्रण सुटल्याने ती रस्ता सोडुन थेट कडेला असलेल्या गाळ्यात शिरली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

परंतु आशिष सरोदे यांच्या गाळ्याचे शटर आणि भिंत पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात झाल्यानंतर आशिष सरोदे यांनी डायल ११२ नंबरवर संपर्क करुन शिरुर पोलिसांना अपघाताची माहिती दिली. प्राथमिक माहितीनुसार सदर फॉर्च्यूनर हि चारचाकी कार वाघोली (ता. हवेली) येथील असल्याचे समजले असुन शिरुर पोलिस या घटनेचा पुढील अधिक तपास करत आहेत.

Video; रांजणगाव MIDC तील MEPL च्या प्रश्नावर खासदार डॉ अमोल कोल्हे आक्रमक

रांजणगाव MIDC तील विविध कामात माजी महिला सरपंचाच्या पतीची लुडबुड…?

शिरुर; कारभारनीच्या नथीतुन तीर मारणाऱ्या महिला सरपंचाच्या पतीची मेहुण्याच्या नावावर MIDC मध्ये दहशत…?

शिरुर; चार वर्षात सरपंच फक्त नामधारी ग्रामपंचायतच्या प्रत्येक निर्णयामध्ये त्या महाशयांचीचं लुडबुड…?

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

19 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago