शिरूर (अरुणकुमार मोटे): देशसेवेत उल्लेखनीय कामगिरी बजावून मायभूमीत परतलेल्या सविंदणे (ता. शिरूर) येथील चार निवृत्त जवानांचा सन्मान सोहळा गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत आणि ढोल-ताशांच्या गजरात मोठ्या जल्लोषात अनोखा सन्मान करत पार पडला.
सुभेदार मेजर संतोष नाथू पोकळे, मेजर दत्तात्रेय मारूती पडवळ, अनिल लक्ष्मण पडवळ आणि दीपक साहेबराव लंघे या निवृत्त जवानांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ग्रामस्थांनी फुलांचा वर्षाव करून त्यांचे जंगी स्वागत केले.यानंतर श्री भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, गौरवचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन जवानांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करून महसूल सहाय्यक पदावर निवड झालेल्या शुभम दत्तात्रेय लंघे, अजित सदाशिव पडवळ, तसेच ग्राम महसूल अधिकारीपदी नियुक्त झालेल्या शंकर बाजीराव नरवडे यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे श्री भैरवनाथ आजी माजी सैनिक संघटना, माँ जिजाऊ सैनिक महिला संघटना आणि सविंदणे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी पंचायत समितीच्या माजी सदस्या अरुणा घोडे, बाळासाहेब डांगे, सरपंच मनिषा नरवडे, उपसरपंच रविंद्र पडवळ, आजी-माजी सैनिक, सरपंच- उपसरपंच, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माँ जिजाऊ सैनिक महिला संघटनेच्या अध्यक्षा सुवर्णा पडवळ यांनी केले, तर आभार श्री भैरवनाथ आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष देवराम मिंडे यांनी मानले.
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…