शिरूर तालुका

सणसवाडी पाठोपाठ कवठे येमाई परिसरात दोन रानगवे दिसल्याने खळबळ

शिरूर (अरुणकुमारमोटे): शिरूर तालुक्यातील सणसवाडी पाठोपाठ कवठे येमाई परिसरात शुक्रवारी (ता.९) दुपारनंतर दोन रानगवे दिसल्याने मोठी खळबळ उडाली आहे . मुंजाळवाडी येथील अष्टविनायक महामार्गालगत असलेल्या एका शेतात हे गवे फिरताना नागरिकांनी पाहिले. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये या गव्यांचे चित्रीकरण देखील केले आहे.

या घटनेनंतर कवठे येमाई चे माजी उपसरपंच विठ्ठल मुंजाळ यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर वनरक्षक नारायण राठोड आणि वनमजूर हनुमंत कारकुड यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

तदनंतर पुन्हा शनिवारी (ता.१०) गव्यांचे येडेबो-हाडे वस्ती परिसरातही दर्शन झाल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने शेतकऱ्यांना आणि स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

नागरिकांनी सतर्क राहून शेतात काम करावे. रानगवे आढळल्यास घाबरून जाऊ नये, तसेच त्यांच्याकडे जाण्याचा अथवा त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करू नये. अशा प्रसंगी त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा, जेणेकरून योग्य त्या उपाययोजना वेळेवर करता येतील.

निळकंठ गव्हाणे

वनपरिक्षेत्र अधिकारी, शिरूर

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

1 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

2 तास ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

3 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

20 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

24 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

24 तास ago