शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) सह परिसरात वारंवार दुचाकी चोरीच्या घटना घडत असताना आता चक्क येथील एका इसमाची चारचाकी कार चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने परिसरात खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सणसवाडी (ता. शिरुर) येथील श्रीनिवास दरेकर यांनी त्यांची एम एच १२ आर टी ७१०२ हि इको कार रात्रीच्या सुमारास त्यांच्या दुकानातील मुलगा अक्षय पवार याच्या घरासमोर लावून कार लॉक करुन घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास अक्षय उठला असता त्याला घरासमोर लावलेली कार दिसली नाही. त्यामुळे अक्षयने श्रीनिवास दरेकर यांना फोन करुन माहिती दिली. त्यानंतर दरेकर सदर ठिकाणी आले असता त्यांनी आजूबाजूला सर्वत्र पाहणी केली तसेच शेजारील सीसीटीव्हीची तपासणी केली असता रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने दरेकर यांची कार चोरुन नेल्याचे निदर्शनास आले.
याबाबत श्रीनिवास एकनाथ दरेकर (वय ४०) रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कृष्णा व्यवहारे हे करत आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…