शिरूर तालुका

बॉयलर चिकनचे बाजारभाव गडाडले…

उन्हाळा तसेच पाणी टंचाईच्या भीतीने पोल्ट्री व्यावसायिक थंड

शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या उन्हाळ्याचे दिवस वाढू लागले असताना तापमान देखील उच्चांक गाठत असल्याचे चित्र दिसत अल्स्याने त्याचा परिणाम शेती व कुक्कुटपालन वर होत आहे, असे असताना पाणी टंचाई व उन्हाची तीव्रता यामुळे अनेक पोल्ट्री व्यावसायिकांनी त्यांचे शेड मोकळे ठेवलेले असल्याने कोंबड्या मिळणे कठीण झाले असल्यामुळे बॉयलर कोंबड्या मिळणे अशक्य होत असल्याने बॉयलर चिकनचे बाजारभाव गडाडले आहे.

सन उत्सवाचे तसेच यात्रेचे दिवस सुरु झालेले असल्यामुळे एकीकडे सर्वत्र चिकनला मागणी वाढत आहे, तर दुसरीकडे काही वर्षापूर्वी झळ बसलेले सर्व पोल्ट्री व्यवसायिकांनी आर्थिक झळ नको म्हणून पोल्ट्रीचे शेड मोकळे ठेवणे पसंत केले असल्यामुळे बाजारात बॉयलर कोंबड्या मिळणे कठीण होऊ लागले आहे.

एक महिन्यापूर्वी १५० रुपये किलोने विक्री केल्या जाणाऱ्या चिकनचे भाव सध्या दोनशे चाळीस रुपयांवर जाऊन पोहचले आहे. मात्र कोठेही कोंबड्या शिल्लक नसल्यामुळे चिकन दुकानदारांना माल देणाऱ्या एजंट लोकांची चांगलीच दमछाक होऊ लागली आहे. परंतु आपला व्यवसाय टिकविण्यासाठी सर्वच जण अतोनात प्रयत्न करत आहे, काही दिवसांपूर्वी बॉयलर ला बाजार भाव नव्हता. मात्र कोंबड्यांना दिली जाणारी औषधे व खाद्य महाग होत होती त्यामुळे खर्च जास्त ब बाजारभाव कमी अशी अवस्था झालेली होती दरम्यान सर्वच ठिकाणी पोल्ट्रीतील शेड फुल भरलेले होते.

परंतु दर कमी होत होता. मात्र सध्या बाजार भाव जास्त असताना पोल्ट्री व्यावसायिकांकडे कोंबड्या शिल्लक नाहीत त्यामुळे चणे आहेत, तर दात नाहीत अन दात आहेत तर चणे नाही अशी अवस्था पोल्ट्री व्यावसायिकांची झाली आहे. मात्र पुढील काळात बाजारात कोंबड्या उपलब्ध न झाल्यास यापेक्षा देखील जास्त भाव होण्याची शक्यता अनेक पोल्ट्री व चिकन व्यावसायिकांनी वर्तवली आहे.

कोंबड्या उपलब्ध नसल्याने भाव वाढला; आबा भगत

सध्या अनेक पोल्ट्री व्यावसायिकांनी पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांचे शेड मोकळे ठेवलेले आहेत, तर यापूर्वी दर कमी झालेले असल्याने कंपन्यांनी शेडमध्ये पक्षी कमी केलेले होते त्यामुळे सध्या कोंबड्या शिल्लक नाहीत त्याचा परिणाम बाजार भावावर झाला असल्याने दर वाढले असल्याचे शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा परिसरात कोंबड्या सप्लाय करणारे होलसेल विक्रेते व्यवसायिक आबा भगत व इरफान मुलाणी यांनी सांगितले आहे.

दर वाढीमुळे ग्राहकांवर परिणाम…

चिकनचे दर वाढल्याने ग्राहक कमी होत आहेत दर वाढ झाल्याने ठराविक ग्राहक चिकन घेण्यास पसंती देत आहेत. त्यामुळे व्यवसायावर परिणाम होत असल्याचे शिक्रापूर येथील आयन चिकन सेंटरचे संचालक सिकंदर शेख यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

5 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

5 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

5 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

5 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

11 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

11 तास ago