शिरूर तालुका

कासारीच्या पाणीपुरवठ्याला तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) गावासाठी शासनाच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी 3 कोटी सोळा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती प्रथम लोकनियुक्त सरपंच सुनिता भुजबळ यांनी सांगितले आहे.

कासारी (ता. शिरुर) या गावची लोकसंख्या 4 हजार च्या आसपास असून सदर गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत निधी देण्याची मागणी शासकीय पातळीवर करण्यात येत असताना शासनाकडून जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी 3 कोटी सोळा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याने गावातील पाणी प्रश्न सुटणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. सदर योजनेमुळे गावातील प्रत्येक वाड्या वस्त्यांवर घरोघरी नळ जोडणी करुन घरोघरी पाणी मिळणार असल्याने महिला वर्गात आनंद व्यक्त करण्यात येत आहे

याबाबत बोलताना सदर योजनेसाठी आम्ही सतत पाठपुरावा करत होतो तसेच गावातील इतर सुख सोयींसाठी आम्ही संबंधित विभागांशी पाठपुरावा करत आहोत असल्याचे सांगत या कामासाठी ग्रामविकास अधिकारी वसंत पवार, माजी सरपंच सुखदेव भूजबळ, उपसरपंच रोहिणी रासकर, संभाजी भुजबळ, माजी उपसरपंच किरण रासकर, गोपाळ भुजबळ, गणपतराव काळकुटे, स्नेहल भुजबळ, स्वाती नवले, सुनिता दगडे, पुनम नवले या सर्वांसह गावातील विविध पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभल्याचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सुनिता भुजबळ यांनी सांगितले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत किरकोळ कारणातून युवकाचा खून…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात मित्राला केलेल्या शिवीगाळचा जाब विचारायला गेलेल्या युवकाला अज्ञात…

21 तास ago

लोणीकंद थेऊर फाटा वाहनांच्या दोन किलोमीटर रांगा…

लोणीकंदः लोणीकंद (ता. हवेली) येथे थेऊर फाटा वळणाला कोरेगाव भीमा कडे येणाऱ्या बाजूला व रस्त्याच्या…

1 दिवस ago

हृदयद्रावक! शिरूर तालुक्यात मामाच्या गावाला आलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू…

पाबळ : शिरूर तालुक्यातील पाबळ येथे मामाच्या गावाला सु्ट्टीसाठी आलेल्या दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून…

1 दिवस ago

पिंपळगाव पिसा येथे रेणुकामाता यात्रेनिमित्त (दि 25) मे रोजी ह भ प निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन

शिरुर (तेजस फडके) श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा गावात रेणुकामाता यात्रेनिमित्त दि 25 मे 2024 रोजी…

2 दिवस ago

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

4 दिवस ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

5 दिवस ago