मुख्य बातम्या

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार करत त्यांना मध्यप्रदेशतील त्यांच्या कुटुंबाकडे पुनः सोपवण्यात आल्याने महीलांसह कुटुंबीयांनी माहेर संस्थेचे आभार मानले यातील एका महिलेला मृत समजुन तिच्या कुटुंबीयांनी तर महिलेला मृत समजून सर्व विधीही केले होते. परंतु माहेर संस्थेमुळे या दोनही महिलांची पुन्हा कुटुंबासोबत भेट झाली.

 

शिरुर तालुक्यातील वढु बुद्रुक येथे गेल्या सत्तावीस वर्षांपासुन माहेर संस्था निराधार, परीतक्ता, अनाथ महिला, मुले, पुरुष वयोवृध्द तसेच मानसिक संतुलन बिघडलेल्या महिला व पुरुष यांच्यासाठी गाव पातळीवर विविध प्रकल्पात कार्यरत असते. सध्या माहेरचे कार्य सात राज्यांमध्ये चालू आहे .त्यातील माहेर संचलित ‘वात्सल्यधाम प्रकल्प’ ज्यांचे मानसिक संतुलन बिघडलेल्या महिला ज्या की बेवारस अवस्थेत रस्त्यावर फिरताना मिळून आलेल्या असतात त्यासाठी कार्यरत आहे.

 

या प्रकल्पातील दोन महिलांचे मध्यप्रदेश येथे जाऊन माहेरच्या कर्मचारी रुपाली त्रिभुवन व अजय वानखेडे यांनी पुनर्वसन केले. प्रवेशिता अंजली कोल या ६ फेब्रुवारी २०२३ रोजी लोणीकंद पोलिसांमार्फत संस्थेत प्रवेशित झाल्या होत्या. प्रवेशा दरम्यान अंजली या अतिशय बिकट अवस्थेत होत्या. सुरुवातीला कोणतीही माहिती सांगता येत नव्हती. औषधोपचार वर सतत समुपदेशन करण्यात आले.

 

यावेळी समुपदेशन दरम्यान त्यांनी मध्यप्रदेशमधील खेरानी गाव जिल्हा कटनी असा पत्ता सांगितला. त्यानंतर तिला त्या पत्यावर घरी नेऊन सोडण्यात आले. त्या महिलेच्या घरी गेल्यावर समजले की अंजली या सहा वर्षांपासून घरातुन निघुन गेल्या होत्या. कुटुंबीयांनी दोन वर्षे त्यांचा शोध घेतला. परंतु त्यानंतर तिला मृत समजून त्यांनी आशा सोडली आणि ती मृत झाल्याचे समजुन सर्व धार्मिक विधी पार पाडले. परंतु तिला भेटल्यावर सर्व कुटुंबाच्या डोळ्यात आनंदाश्रु दिसुन आले.

 

तसेच दुसरी प्रवेशिता सुमित्रा साहू ही दिनांक २६ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रवेशित झाली होती. त्यांच्याशी संवाद साधून तसेच औषधोपचाराने त्यांना पतीचा फोन नंबर आठवला. त्या फोन क्रमांकावर संपर्क साधत त्यांचा पतीसोबत संवाद झाला. त्या दरम्यान माहिती समजली की त्यांचे पती अपंग असल्यामुळे एवढ्या लांब येऊ शकत नाही. त्यामुळे माहेरच्या कर्मचाऱ्यांनी मध्यप्रदेश येथे जात त्यांचे पुनर्वसन केले. सुमित्रा या तीन वर्षापासून घरातून बेपत्ता होत्या. त्यांना त्यावेळेस तीन महिन्याचे बाळ होते. त्यांचा त्यांच्या कुटुंबियाने आनंदाने स्वीकार केला. या दोन्ही कुटुंबाने माहेर संस्था आणि संस्थेच्या संस्थापिका लुसी कुरियन यांचे आभार मानले.

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे-अहमदनगर महामार्गावरील दिशादर्शक फलकाचा जाहिरातीसाठी सर्रास वापर

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

2 तास ago

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांकडून अर्ज मागविले

२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…

4 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा; एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा बळीराजाला समर्पित…

4 तास ago

५ हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर घणाघात

हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली…

5 तास ago

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

8 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

16 तास ago