शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथील शिक्रापूर न्हावरा रस्त्यालगत असलेल्या गणपती माळ परिसरात असलेल्या गणपती मंदिरात विनायक चतुर्थी व श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला असून येथे भाविकांची मांदियाळी दिसून आली आहे.
कासारी (ता. शिरुर) येथील शिक्रापूर न्हावरा रस्त्यालगत असलेल्या गणपती माळ परिसरात तळेगाव ढमढेरे, कासारी, टाकळी भिमा व निमगाव म्हाळूंगी या चार गावांच्या शिवेवर असणाऱ्या गणेश मंदिरात गणेश जयंती मोठ्या उत्साह व भक्तीभावाने साजरी करण्यात आली. येथे गणेशाचे जागृत देवस्थान असल्याने आणि नवसाला पावणारा गणपती बाप्पा अशी सर्वदूर ख्याती असल्याने पहाटेपासूनच पूजा विधीला प्रारंभ करत भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. यावेळी बालचिमुकल्यानी केलेली फुलांची आकर्षक सजावट कौतुकास्पद होती. तर पहाटे काकड आरती, श्रीचा अभिषेक व महापूजा, दुपार नंतर भजन, सायंकाळी हरिपाठ महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता.
गणेश जयंतीच्या निमित्ताने ज्यांचीच्या ह. भ. प. पंढरीनाथ महाराज भुजबळ यांचे कीर्तन व सार्वजनिक भजनी मंडळाचे भजन आणि हरिजागर अशा विविध कार्यक्रमाचे करण्यात आले होते. यावेळी गणेश जयंती निमित्त मंदिरावर आकर्षक विदयुत रोषणाई देखील करण्यात आली होती. सदर कार्यक्रमासाठी तळेगाव ढमढेरे, कासारी, माळवाडी, नरकेवाडी, होमाचीवाडी, टाकळी भिमा, निमगाव म्हाळूंगी, घोलपवाडी यांसह आदी परिसरातील आबालवृद्ध व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
२० नगरसेवकांचे ठरावाला समर्थन; गादियांसह राष्ट्रवादीच्या सहा नगरसेवकांचा सभात्याग शिरूर (तेजस फडके): शिरूर नगरपरिषदेच्या राजकारणात…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून चक्क पोलीस ठाण्यासमोरच दोन…
विद्यार्थ्यांना एआय, रोबोटिक्स, ड्रोन आणि थ्रीडी प्रिंटिंगचे मिळणार प्रात्यक्षिक शिक्षण; उच्च शिक्षणासाठी ठरणार उपयुक्त शिरूर…
पाणीगळती, पाणीचोरी आणि टँकरच्या काळाबाजारावर कारवाई होणार; पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांचे नळजोड तोडणार! पुणे :…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील न्हावरा रोड येथे दुचाकीवरुन पडून गंभीर जखमी झालेल्या २६ वर्षीय…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) : घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन…