कासारीत गणेश जयंतीनिमित्त कार्यक्रम उत्साहात

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथील शिक्रापूर न्हावरा रस्त्यालगत असलेल्या गणपती माळ परिसरात असलेल्या गणपती मंदिरात विनायक चतुर्थी व श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला असून येथे भाविकांची मांदियाळी दिसून आली आहे.

कासारी (ता. शिरुर) येथील शिक्रापूर न्हावरा रस्त्यालगत असलेल्या गणपती माळ परिसरात तळेगाव ढमढेरे, कासारी, टाकळी भिमा व निमगाव म्हाळूंगी या चार गावांच्या शिवेवर असणाऱ्या गणेश मंदिरात गणेश जयंती‎ मोठ्या उत्साह व भक्तीभावाने साजरी करण्यात‎ आली. येथे गणेशाचे जागृत देवस्थान असल्याने आणि नवसाला पावणारा गणपती बाप्पा अशी सर्वदूर ख्याती असल्याने पहाटेपासूनच पूजा विधीला प्रारंभ करत भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. यावेळी बालचिमुकल्यानी केलेली फुलांची आकर्षक सजावट कौतुकास्पद होती. तर पहाटे काकड आरती, श्रीचा अभिषेक व महापूजा, दुपार नंतर भजन, सायंकाळी हरिपाठ महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता.

गणेश जयंतीच्या निमित्ताने ज्यांचीच्या ह. भ. प. पंढरीनाथ महाराज भुजबळ यांचे कीर्तन व सार्वजनिक भजनी मंडळाचे भजन आणि हरिजागर अशा विविध कार्यक्रमाचे करण्यात आले होते. यावेळी गणेश जयंती निमित्त मंदिरावर आकर्षक विदयुत रोषणाई देखील करण्यात आली होती. सदर कार्यक्रमासाठी तळेगाव ढमढेरे, कासारी, माळवाडी, नरकेवाडी, होमाचीवाडी, टाकळी भिमा, निमगाव म्हाळूंगी, घोलपवाडी यांसह आदी परिसरातील आबालवृद्ध व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.