शिरुरच्या पुर्व भागात मुजोर वाळु माफियांचा हौदोस; गुनाट येथील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

शिंदोडी (तेजस फडके) शिरुरच्या पुर्व भागातील घोड धरणात गेल्या तीन महिन्यांपासुन प्रचंड मोठया प्रमाणात यांत्रिक बोटींच्या साह्याने बेसुमार वाळू उपसा चालु असुन याबाबत व्हिडीओ करुन तो सोशल मिडियावर व्हायरल केल्याचा राग आल्याने वाळू माफियांनी गुनाट येथील शेतकरी भिवसेन कोळपे यांना फोनवर धमकी देत त्यांच्या शेतीतील मोटारीसह, बोअरवेल व केबलची तोडफोड करत लाखों रुपयांचे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले असुन या मुजोर वाळु माफीयांवर महसुल व पोलिस विभाग आता कारवाईचा बडगा उगारणार का…? अशी सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

गुनाट (ता. शिरुर) येथील शेतकरी भिवसेन कोळपे यांनी काही दिवसांपुर्वी गुनाट येथील कोळपेवस्ती येथे घोड धरणातुन बेकायदेशीररीत्या वाळू उपसा होत असल्याबाबत व्हिडिओ करुन तो सोशल मिडीयावर व्हायरल केला होता. याचाच राग मनात धरुन मुजोर झालेल्या वाळू माफियांनी कोळपे यांना फोन करुन ‘वाळू माफियांच्या नादाला लागू नकोस’ अशी धमकी देत शनिवार (ता १९) रोजी २४३, १५८, १६३ या तीनही गटातील दहा अश्वशक्तीचे दोन विद्युत पंप नदीपात्रात टाकून दिले. तर शेतातील बोअरवेल आणि शेतातील पाइपलाइनची मोडतोड केली.

 

घोड धरणातील वाळूमाफियांकडून शेतमालाच्या होणाऱ्या नुकसानीबाबत संबंधित यांनी पोलिस व महसुल प्रशासनाकडे सातत्याने दाद मागत असल्यानेच हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत भीवसेन कोळपे (रा. गुनाट, ता. शिरुर) या शेतकऱ्याने शिरुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

 

पुर्व भागातील राजकीय पदाधिकारी गप्प का…?

शिरुरच्या पुर्व भागात निमोणे येथील कुऱ्हाडवाडी तसेच गुनाट येथील कोळपेवस्ती तसेच चिंचणी येथील घोड धरणाच्या परिसरातून सर्रास बेकायदेशीरपणे वाळू उपसा तसेच वाळू वाहतुक चालु असताना या गावांतील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी नक्की काय करतात हा मोठा यक्षप्रश्न आहे. तसेच महसूल विभाग, पोलिस तसेच वाळू माफियांशी संगनमत करत याच राजकीय पुढाऱ्यांनी त्यांना वाळू उपशासाठी या भागात आणले असल्याचीही दबक्या आवाजात जोरदार चर्चा सुरु असुन घोड धरणातील बेकायदेशीर वाळू उपशासाठी दहशत निर्माण करणारे वाळू माफिया घोड धरणातील ‘काळ सोनं’ मिळविण्यासाठी शेतकरी व सर्वसामान्य लोकांच्या जीवावर उठतात की काय…? अशी सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

घोड धरणातील वाळू माफियांनी वाळू वाहतुकीसाठी आमच्याच शेतातून रस्ते करायचे, त्यामुळे होणारे नुकसानही आम्हीच सहन करायचे असा सध्या प्रकार सुरु असुन वाळुमाफियांमुळे आम्हाला ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सहन करावा लागत आहे. माझ्या शेती साहित्याचे नुकसान केले, त्या रात्री त्या परिसरात कोणाकोणाचे मोबाईल कार्यान्वित होते. कोण कोणाच्या संपर्कात होते, हे तपासल्यास खरे गुन्हेगार सापडतील.

भिवसेन कोळपे

नुकसानग्रस्त शेतकरी

शिरुर-आंबेगाव मतदार संघातील बारा गावच्या पाणीप्रश्नामुळे वळसे पाटलांवर शेतकरी नाराज…?

शिरुर; आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार:- संगीता राजापूरकर

शिरुर-आंबेगावच्या ‘वाल्या’ चा वाल्मिकी जयंतीच्या दिवशीच देवदत्त निकम यांनी घेतला खरपूस समाचार

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

8 तास ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

17 तास ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

18 तास ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

18 तास ago

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…

18 तास ago

मोदींनी सोनम वांगचुकांची भेट का घेतली नाही?; राम मंदिर चोरीवर भाजप-आरएसएसवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…

18 तास ago