शिरूर तालुका

कारेगावच्या सरपंचपदी वृषाली गवारे यांची बिनविरोध निवड…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील कारेगावच्या सरपंचपदी वृषाली प्रशांत गवारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असुन पुर्वीच्या सरपंच निर्मला शुभम नवले यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर उपसरपंच असलेल्या तुषार नवले यांची प्रभारी सरपंच म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र अगदी दोन दिवस पदभार स्वीकारल्यानंतर सरपंच पदाची निवडणूक लावण्याची ग्रामपंचायत सदस्य आणि अधिकारी यांनी तयारी केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन संजीव पुंडलीक साळवे यांनी कामकाज पाहिले.

कारेगाव ग्रामपंचायतच्या रिक्त झालेल्या सरपंच पदावर निर्मला नवले यांनी राजीनामा दिल्यानंतर १८ ऑक्टोबर २०२४ रोजी वृषाली प्रशांत गवारे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणुक निर्णय अधिकारी संजीव पुंडलीक साळवे यांनी केली आहे. वृषाली गवारे यांच्या निवडीनंतर ग्रामस्थांकडून त्यांच्यावर कारेगावसह आजुबाजुच्या शुभेच्छाचा वर्षाव केला जात आहे.

यावेळी ग्रामविकास अधिकारी किसन बिबे, गावकामगार तलाठी रवींद्र जाधव, नवले तुषार प्रकाश, निर्मला शुभम नवले, नवले संदीप विश्वास, कोहोकडे अजित प्रल्हाद, नवले सोनाली विकास, तळेकर शहाजी पोपट, फलके तेजस गणपत, शेलार नागेश सर्जेराव, कोहोकडे जयश्री रामदास, हौसाबाई लाला जगताप ( सर्व ग्रामपंचायत सदस्य ) १३ पैकी ११ सदस्य उपस्थित होते.

कारेगावचे उपसरपंच तुषार नवले यांना लागली प्रभारी सरपंचपदाची लॉटरी…

शिरूरचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे निष्ठावंत म्हणून उतरले राजकीय रिंगणात…

शिरुर-आंबेगाव मतदार संघातील बारा गावच्या पाणीप्रश्नामुळे वळसे पाटलांवर शेतकरी नाराज…?

ठाकरे गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कटके यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; शिरूर-हवेलीत रंगणार सामना…

विधानसभा मतचाचणी! आंबेगाव-शिरूर; शिरूर-हवेली मतदार संघामधून पसंती कोणाला?

Loading ...
Loading ...
शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

1 दिवस ago